Just another WordPress site

तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, मालमत्ता, ठेवी, सोन किती? आकडेवारी पाहून थक्क व्हाल

देशभरातील प्रसिद्ध असलेल्या मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी मंदिराचं नाव नेहमीच घेतलं जातं. तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली.

 

महत्वाच्या बाबी

१. तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक
२. तिरुपती बालाजी देवस्थानकडून मंदिराची संपत्ती जाहीर
३. मंदिराच्या संपत्तीत होतेय मोठी वाढ, ट्रस्टने दिली माहिती
४. मंदिरातील सोन्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात

 

देशभरात शिर्डी, तिरुपती बालाजी, वैष्णव देवी, केदारनाथ, श्री सिद्धिविनायक यांसारखी बरीच मोठी मंदिर आहेत. अनेकांना या मदिरांची संपत्ती किती असेल, अशा प्रश्न पडतो. नुकताच तिरुपती बालाजी देवस्थानाची संपत्ती जाहीर करण्यात आली. तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर न्यासाने ट्रस्टकडील संपत्तीची माहिती दिली. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे २.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. याबाबत मंदिर ट्रस्टने सांगितले की, त्यांच्याकडे सध्या १०.३ टन सोने आहे. जे राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आलंय. या सोन्याची किंमत सध्याच्या बाजार भावानुसार अंदाजे ५ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. यामध्ये २.५ टन सोन्याचे दागिने आहेत, त्यापैकी अनेक पुरातन वस्तू सुद्धा आहेत. याशिवाव, ट्रस्टकडे १५ हजार ९०० कोटी रुपयांच्या रकमेचाही समावेश आहे.
तिरुपती येथे असलेल्या श्रीवेंकटेश्वराचे जगभरात कोट्यवधी भाविक आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या देणग्या तसेच दान केले जाणारे सोन्याचांदीचे, हिऱ्यांचे दागदागिने आणि अन्य जडजवाहिर यामुळे इतकी संपत्ती या देवस्थानाकडे जमा झाली. २०१९ साली तिरुपती देवळाकडे १३ हजार ०२५ कोटी रुपयांच्या मुदतठेवी आणि ७.३ टन सोने होते. आता तीन वर्षांनी त्यात मोठी वाढ झाली आहे.
तिरुपती देवस्थानाकडे १५ हजार ९३८ कोटी रुपये रकमेच्या मुदतठेवी खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. १०.३ टन सोने बँकेत ठेवले. देवस्थानला ६६८ कोटी रुपये मुदतठेवींवरील व्याजाच्या रूपाने मिळतात. तर १ हजार कोटी रुपये भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेल्या रोख रकमेतून मिळतात. ७,००० एकर जमीन देवस्थानच्या मालकीची असून ९०० स्थावर मालमत्ता तिरुपती देवस्थानच्या मालकीच्या आहेत. ही संपत्ती पाहता, आपल्या देशाला आजही ‘सोने की चिडिया’ म्हणायला हरकत नाही, नाही का?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!