Just another WordPress site

जगाची लोकसंख्या ८ बिलियनच्या आकडा पार करणार, लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनलाही मागे टाकणार?

चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या चीन सर्वाधिक लोकसंख्येसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, लवकरच भारत याबाबतीत चीनला मागे टाकणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पुढील वर्षापर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या येत्या १५ नोव्हेंबर नंतर ८ बिलियनचा आकडा पार करेल.

 

महत्वाच्या बाबी

१. सद्याच्या घडीला लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा १ नंबरवर
२. जगाची लोकसंख्या८ बिलियनचा आकडा पार करेल – UN
३. अहवालानुसार भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार
४. १९५० ते २०२२ या कालखंडात लोकसंख्या तीनपटीने वाढली

 

लोकसंख्या वाढीचा दर गेल्या काही वर्षांपासून कमी झाला आहे. पण संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार येत्या काही दशकात जगाची लोकसंख्या ही वाढतचं राहील. २०५० पर्यंत ही संख्या ९.७ अब्जापर्यंत जाईल. २०२२ मध्ये जागतिक लोकसंख्यामध्ये ६५ वर्षे असलेल्यांची टक्केवारी १० % आहे. तर हीच टक्केवारी २०५० पर्यंत १६ % पर्यंत जावू शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात वर्तवला. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असंही सांगितलं की, २०३० मध्ये लोकसंख्या सुमारे ८.५ अब्ज, २०५० मध्ये ९.७ अब्ज आणि २०८० मध्ये सुमारे १०.४ अब्ज एवढी वाढेल, दरम्यान, हा आकडा नक्कीच जगाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे.

जागतिक महामारी कोरोनाचा सर्वच घटकांवर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. अजूनही याचे परिणाम लोकांवर होत आहेत. या काळात लोकसंख्यावाढीवर खूप परिणाम झाल्याचे विविध अभ्यास सांगत आहेत. मृत्यूदरात घट झाल्याने २०५० साली सरासरी जागतिक दीर्घायुष्य साधारणत: ७७.२ वर्षे असेल असा अंदाज वर्तवला. जगभर कोरोना विषाणूमुळे गर्भधारणा आणि जन्मदरावर परिणाम झाला. दुसरं म्हणजे, मृत्यूदरात मोठी घट झाली. १९५० मध्ये सरासरी १००० जणांपैकी २० जणांचा मृत्यू होत असे. तर २०२० साली हा आकडा ८ वर पोहचला आहे.

अनेकदा गर्भधारणा रोखण्याची माहिती महिलांना नसल्याने इच्छा नसतानाही मुलांचा जन्म होतो. २०१५ च्या आकडेवारीनुसार आता ६५ टक्के महिला गर्भनिरोधकांचावापर करतात. मात्र, जवळपास ३५ टक्के महिला अजूनही गर्भनिरोधक वापर करत नाही.
याशिवाय, बाल मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्यानेही लोकसंख्या वाढीत भर पडलेली आहे. या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, १९५० ते २०२२ या कालखंडात जगाची लोकसंख्या तब्बल तीनपटीने वाढल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.

सद्याच्या घडीला लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा एक नंबरवर आहे तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ ला भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असेल. तर चीन दुसऱ्या क्रमांकावर असेल. ही बाब भारतासाठी चिंताजनक असेल. सध्या चीनची लोकसंख्या पाहता ती सुमारे १.४ अब्ज आहे ती २०५० पर्यंत ती १.३ अब्जावर राहील, असं संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!