Just another WordPress site

सरकारी कर्मचाऱ्यांची मज्जा! मोदी सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट, पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

नवी दिल्ली: सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फिटमेंट फॅक्टर वाढ आणि HRA वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ मध्ये पुन्हा DA (महागाई भत्ता) वाढ मिळण्याची शक्यता आहे. होय, महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवण्याची सरकारची योजना आहे. एआयसीपीआय (SIP) निर्देशांकाच्या आकडेवारीने याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना २०२३ च्या सुरुवातीला किंवा नवीन वर्षातच मोठी भेट मिळेल.

 

AICPI निर्देशांक वाढला

AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा तेजी दर्शवली आहे. यावेळी, सरकार महागाई भत्ता ४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकार जानेवारीपर्यंत डीए वाढवण्याची शक्यता आहे. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीत विलक्षण वाढ झाल्यानंतर DA वाढीचा अहवाल समोर आला आहे. औद्योगिक कामगारांच्या महागाईच्या आकड्यांमध्ये वाढ डीए ४ टक्के वाढ दर्शवते. मात्र, केंद्राकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

डीए आता ४२ टक्के होईल

कर्मचार्‍यांना जानेवारी २०२३ मध्ये जास्त भत्ते मिळण्यास सुरुवात होईल, पण सरकार मार्च २०२३ पर्यंत त्याची घोषणा करू शकते. जर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणखी ४ टक्क्यांनी वाढला तर महागाई भत्त्यात ४२ टक्क्यांपर्यंत वाढ होईल.

 

कामगार मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली

कामगार मंत्रालयाने AICPI डेटा उपलब्ध करून दिला आहे. सप्टेंबरपासून ही संख्या १३१.२ झाली आहे. जून ते सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत AICPI निर्देशांक एकूण २.१ टक्क्यांनी वाढला आहे. मागील महिन्याच्या ऑगस्टच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, केंद्रीय कर्मचारी (सरकारी कर्मचारी) त्यांच्या थकित DA च्या (महागाई भत्ता) प्रतीक्षेत आहेत. आणि त्याची प्रतीक्षा नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येऊ शकते. या महिन्याच्या अखेरीस १८ महिन्यांचा थकबाकी डीए देण्याबाबत चर्चा होऊ शकते, अशी बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंत डीए थकीत आहे. देशात कोविड-१९ आजाराच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांचा भत्ता रोखून धरला होता. पण आता करोना महामारीच्या काळात लादलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले असून, कर्मचारी त्यांच्या थकित डीएच्या रकमेची मागणी करत आहेत.

 

बैठक होण्याची शक्यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १८ महिन्यांच्या थकबाकी DA वर बोलणी करण्यासाठी कर्मचारी आणि पेन्शनर्स युनियनच्या प्रतिनिधींची कॅबिनेट सचिवांसोबत बैठक होणार आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता थकबाकीदारांची चर्चा झाली तर एकरकमी ११ टक्के थकबाकी दिली जाणार आहे, असे वृत्त समोर येत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार DA थकबाकीचे पैसे मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!