Just another WordPress site

भीषण अपघात! पाथर्डी तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनजण ठार ; एकजण जखमी

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. अपघाताची ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अमरापूर-सुसरे रस्त्यावर घडली. नामदेव बबन आठरे (वय २८) व विजय मारूती मिसाळ (वय २२, दोघे रा.सुसरे, ता.पाथर्डी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर, या अपघातात आदेश शेषराव कंठळी (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर या तिघांना उपचारासाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वी आठरे व मिसाळ यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या आदेश शेषराव कंठळी याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नामदेव आठरे हा तरुण शेती व्यवसाय करायचा. त्याला अवघ्या चार महिन्यांची मुलगी आहे. तर, विजय मिसाळचे आयटीआयचे शिक्षण झाले होते. तो सीसीटीव्ही कॅमेर्‍याची कामे करत होता. जखमी आदेश कंठळी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाल्याने सुसरे गावावर मोठी शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला असून, पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!