Just another WordPress site

सिने सृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende Passes Away) यांचे निधन झाले आहे. रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडे यांच्या अंत्ययात्रेला दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जातील.

मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम केलेल्या सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार, त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठीशिवाय त्यांनी वास्तव, गांधी, सरफरोश या सिनेमांमध्ये (Actorv Sunil Shende Movies) महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. निवडुंग (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८९), जसा बाप तशी पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिम्हा (१९९१) या सिनेमांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. त्यांनी केलेल्या विविध सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान गेल्या काही काळापासून मात्र ते सिनेइंडस्ट्रीपासून दूर होते. अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!