Just another WordPress site

भीषण अपघात! बिहारमध्ये गर्दीत ट्रक घुसला, १५ जण ठार, ३० हून अधिक जण गंभीर जखमी

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात पंधरा मृतांमध्ये सात मुलांचाही समावेश आहे. जखमींचा अधिकृत आकडा आलेला नाही. मात्र, तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. ही घटना हाजीपूर-महनार मार्गावर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील हाजीपूर-महनार मार्गावर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात हा भीषण अपघात झाला. हा अपघात काल रात्री ९ च्या सुमारास झाला. हाजीपूर-महनार महामार्गाजवळ स्थानिक देवता भुमिया बाबाची पुजा करण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. त्याच दरम्यान ट्रकवरील निंयत्रण सुटल्याने भरधाव ट्रक त्या गर्दीतून जात एका झाडाला जावून धडकला. यात गर्दीतील बरेच लोक चिरडले. अस सांगण्यात आलं की, ट्रक चालक नशेमध्ये होता. दरम्यान, या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. यात सात लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करून दिली.
वैशालीमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्याबरोबरच अपघातात जखमी झालेल्यांना पंतप्रधान मोदी यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची तर जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या दुर्घटनेचा पुढील तपास पोलिस करताहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!