Just another WordPress site

भीषण अपघात! लग्नाची शॉपिंग करण्यासाठी निघालेल्या ऑटोला भरधाव कारची धडक, सात जण गंभीर जखमी

अमरावती : लग्नाची शॉपिंग करण्यासाठी निघालेल्या ऑटोला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अमरावतीमध्ये हा अपघाताचा थरार घडला. मुलगा, सून, सासू यांच्यासह सात जण अपघातग्रस्त झाले.

नागपूरवरुन भरधाव वेगात येणाऱ्या कारने ऑटोला धडक दिली. यामध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांसह ऑटो चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिझिलँड प्रवेशद्वारासमोर घडली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, अकोला येथील गेडाम परिवारातील सदस्य कापड खरेदी करण्यासाठी अमरावतीवरुन ऑटो क्र. एम. एच. २७, पी. ५७३३ ने बिझिलँड येथे जाण्यासाठी निघाले होते. बिझिलँड येथे आत जाण्यासाठी ऑटो चालक महामार्गावरून वळण घेत असताना नागपूरवरुन भरधाव येणाऱ्या एम. एच. ४०, ए. सी २८८२ ने जबर धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की ऑटोने दोन पलटी घेतल्या. यामध्ये नितीन गजानन वाघमारे (३६) अकोला, राहुल देविदास फुलझेले (३५) वाळकी जि. यवतमाळ, शैलेश अशोक गेडाम (३४) अकोला, चैताली शैलेश गेडाम (३२) अकोला, सुरेखा अशोक गेडाम (६०) अकोला, बापूराव नामदेव कोकाटे (५५) इर्विन वसाहत अमरावती, नरेश नितनवरे (४८) बेलपुरा हे जखमी झाले.

घटनास्थळावर नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!