Just another WordPress site

ST कर्मचाऱ्यांना अच्छे दिन! कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ, शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्थात ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता दिला जातो. मात्र महागाई भत्ता वेळेवर दिला जात नसल्याची तक्रार एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असे. यामुळे २८ टक्के असलेल्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांमधून करण्यात येत होती.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, ”एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याबाबतचे पत्र राज्य सरकारने महामंडळाला पाठवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना यंदाच्या वेतनात वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे.”

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अत्यंत कमी आहेत. यामुळे अनेक एसटी कुटुंबियांमध्ये आर्थिक चणचण भासते. याच आर्थिक तणावामुळे राज्यात गेल्या काही दिवसांत तीन एसटी कर्मचाऱ्यानी आत्महत्या केली. आत्महत्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. भविष्यात एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, त्या आधी तातडीने निर्णय राज्य सरकारने घ्यावे, असे एसटीतील कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!