Just another WordPress site

टक्कल पडायला लागली? मग फक्त ‘हा’ एक उपाय करा, गळालेले केस पुन्हा उगवतील

टक्कल पडायला लागलं? मग फक्त 'हा' एक उपाय करा, गळालेले केस पुन्हा उगवतील

सध्याच्या धावपळीच्या जगात महिला आणि पुरुष दोघांमध्येही केस गळतीची समस्या दिसून येते. तारुण्यातचं केस गळतीची समस्या सुरू झाल्यानं तरुण वयातच अनेकजण म्हातारे दिसू लागतात केस पुन्हा उगवावे याासठी त्यासाठी काहीजण बरेच पैसेही खर्च करताना दिसतात. कारण टक्कल पडणं ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी घटना असते. पण अशावेळी मनात प्रश्न येतो की या टक्कल पडलेल्या डोक्यावर पुन्हा केस उगवतील का? जर तुम्हाला याचे उत्तर अजूनही मिळाले नसेल तर त्याचे उत्तर आहे हो, येतील. टक्कल पडलेल्या जागी पुन्हा केस उगवू शकतात. ते सुद्धा कोणत्याही हेअर ट्रांसप्लांटेशन शिवाय! त्यामुळं तुमचे केस गळत असतील आणि तुमच्या डोक्यावर वेगाने टक्कल पडत असेल तर घाबरू नका. कारण काही आयुर्वेदिक उपाय करून तुम्ही केस गळती थांबवू शकता. विशेष म्हणजे आयुर्वेदिक उपायांचे काही साईड इफेक्टही नाहीत आणि तुम्ही घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हे औषध बनवू शकता. चला तर जाणून घेऊया केस गळती रोखण्यासाठी नेमके काय आहेत घरगुती उपाय?

भोपळ्याच्या बियांचे तेल

२०१४ मध्ये ‘नॅशनल सेंटर फॉर बायॉटेक्नॉलजी इन्फॉर्मेशन’ने केसांच्या वाढीबाबत केलेल्या एका स्टडीनुसार जी लोक प्रत्येक दिवशी ४० मिलिग्राम भोपळ्याच्या बियांचे तेल वापरतात त्यांच्या केसवाढीचा वेग ४० टक्के अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी तुम्हाला जवळपास सहा महिने दररोज भोपळ्याच्या बियांचे तेल केसांना लावणे आवश्यक आहे. असे केल्यास केस वेगाने वाढतील, मजबूत होतील आणि टक्कल पडण्याची समस्याही कमी होण्यास मदत होईल, असेही अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

केळी आणि लिंबू

एक केळं चांगलं मॅश करा. त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. यानंतर, ही पेस्ट हेअर कलर ब्रशच्या मदतीने डोक्यावर लावा, काही तासांनंतर शॅम्पू करा. यामुळे केस गळणं देखील कमी होतं आणि केस पुन्हा वाढू लागतात.

आवळा-कडुलिंब

थोडी आवळा पावडर आणि कडुलिंबाची पानं पाण्यात नीट उकळा. आठवड्यातून दोनदा या पाण्याने आपलं डोकं धुवा. यामुळे केस गळणं थांबेल आणि नवीन केसही येऊ लागतील.

अरोमा थेरपी

एका स्टडीनुसार, केसांची वाढ होण्यास आणि नवीन केस उगवण्यासाठी अरोमा थेरपी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्या लोकांना अनुवांषीकतेमध्ये टक्कल मिळालेल त्यांच्या डोक्यावरही या थेरपीमुळे नवे केस उगवले आहेत. या थेरपीसाठी तुम्ही औषधी वनस्पतीचे तेल वापरू शकता. तुळस, रोजमेरी, लेवेंडर आणि थाईम यापासून बनवण्यात आलेल्या तेलांचा वापर करू शकता.

लिंबाचा रस

लिंबाचा रस डोक्यावरील केसांचे आयुष्य वाढवतो, तसेच डॅड्रफ दूर करून नवीन केस उगवण्यासही मदत करतो. डोक्यावरील ज्या भागात केसांची गळती होते त्या भागात नियमित लिंबाचा रस लावल्यास तेथे नवीन केस येण्याचा मार्ग सुकर होतो. सकाळी अंघोळ करण्यापूर्वी लिंबाचा रस लावावा आणि दोन तासांनी डोके धुवावे. किंवा रात्री झोपताना लिंबाच्या रसाने डोक्यावर मसाज करावी.

दही

दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. यामुळे केस मऊही होतात.

कोरफड

कोरफडीचा गर देखील केसांच्या आरोग्यासाठी प्रभावी असतो. कोरफडीचा गर केसांना लावल्यास त्याच्यातील इन्जाईम्सने केसांची रोमछिद्र ओपन होतात आणि केसगळती दूर होते. तसेच केस मऊ होण्यासही मदत होते.

जेष्ठमध आणि केशर

केस गळती थांबवण्यासाठी आणि टक्कल कमी करण्यासाठी जेष्ठमध वापरू शकता. यासाठी थोडं जेष्ठ मध घ्या. त्यात चिमूटभर केशर आणि दुधाचे काही थेंब घाला. नंतर त्याची बारीक पेस्ट करा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा.

कांदा

कांदा सोलून मधून दोन भाग करा. यानंतर, जिथे केस जास्त गळत आहेत. त्या ठिकाणी कांदा डोक्यावर हलक्या हाताने चोळा. हा उपाय रोज ५ ते ७ मिनिटं करा. यामुळे केस गळणं थांबेल आणि नवीन केसही येण्यास सुरवात होईल.

 

(Disclaimer : केसांच्या आरोग्याबाबतीतील या काही सामान्य टिप्स आहेत. या लेखात देण्यात आलेल्या माहितीची ‘लोकहित वार्ता’ पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शिवाय, तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!