Just another WordPress site

CISF मध्ये विविध पदांची भरती, वाचा कुठे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत?

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात; पण नोकरी मिळत नाही, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी सीआयएसएफने सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरीयल) पदासाठी अर्ज मागवले. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या दोन्ही पदांमिळून ५४० पदे रिक्त आहेत. वाचा कुठे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, काय पात्रता आहे, कुठे अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) -२०२२ मध्ये सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरीयल)ची भरती होतेय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खालील सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) वेतनस्तर-५ (वेतनश्रेणी रु. २९, २०० ९२,३००/-) मध्ये, आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल) वेतन स्तर-४ (वेतनश्रेणी रू. २५,५००-८१,१०० मध्ये) हंगामी पदे भरण्यासाठी भारतीय नागरिक असलेल्या पुरूष आणि महिलांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल) पदासाठी श्रेणीनिहाय रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत ज्या भरतीच्या कोणत्याही वेळी किंवा टप्प्यावर वाढू किंवा कमी होऊ शकतात.
पदाचे नाव – सहाय्यक उप निरीक्षक (स्टेनोग्राफर)
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर या पदासाठी एकूण १२२ जागांसाठी भरती होणार आहे. या १२२ मध्ये पुरुषांसाठी ९४, महिलांसाठी १० आणि डिपार्टमेंटल (एलडीसीई) साठी अठरा जागा आहेत.
खुला वर्ग -५७
अनुसुचित जाती -१६
अनुसुचित जमाती – ८
इतर मागास वर्ग -३१
आर्थिक दृष्ट्या दुर्बल -१०
अशा प्रकारे जातिनीहाय जागांची विभागणी केली आहे.

 

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल)
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल) या पदासाठी एकुण ४१८ जागांसाठी भऱती होणार आहे. या ४१८ मध्ये पुरुषांसाठी ३१९, महिलांसाठी ३६ आणि डिपार्टमेंटल (एलडीसीई) साठी ६३ जागा आहेत.
खुला वर्ग -१८२
अनुसुचित जाती -६१
अनुसुचित जमाती – २९
इतर मागास वर्ग -११२
आर्थिक दृष्ट्या दुर्बल -३४
अशा प्रकारे जातिनीहाय जागांची विभागणी केली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख :  २५ ऑक्टोबर.
संपूर्ण तपशीलासाठी सीआयएसएफची वेबसाईट म्हणजे https://cisfrectt.in ला भेट द्या. आणि आजचं जॉबसाठी अर्ज करा.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!