Just another WordPress site

धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून महिलीने तरुणाचे लिंग कापले, पुण्यातल्या विचित्र घटनेने खळबळ

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यात आता पुण्यातून आणखी एक मोठी धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. कुख्यात गुंड निल्य वाडकरच्या बायकोने छेडछाडीला कंटाळून तरुणाचे लिंग कापल्याचा भयानक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी महिलेसह इतर तीन अज्ञात आरोपींनी मिळून तरुणाचे लिंग कापले. विनायक तानाजी लोंढे असे लिंग कापलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पुनम निलेश वाडकर असे महिला आरोपीचे नाव आहे. गुंड निलेश वाडकर याचा काही वर्षांपूर्वी खून झाला आहे. तसेच त्याची पत्नी पुनम वाडकर ही सध्या बचत गटाच्या माध्यमातून काम करते.
फिर्यादी विनायक लोंढेची कर्ज देण्याच्या बहाण्याने पुनम समवेत ओळख झाली होती. ओळखीनंतर पूनमला फिर्यादी लोंढे व्हाट्सअॅपवर अश्लील चॅटिंग करत होता. यानंतर कंटाळलेल्या पूनमने आपल्या इतर तीन साथीदाराला सांगून त्याला भेटण्यास कात्रज जवळील स्वामीनारायण मंदिराजवळ बोलवले. यानंतर दुचाकीवर बसून कात्रज बोगद्याजवळ नेत त्याचा लिंग कापण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!