Just another WordPress site

धक्कादायक! रागाच्या भरात महिलेनं आपल्या दोन मुलींसह नदी उडी मारून केली आत्महत्या, भंडाऱ्यातील घटना

भंडारा : भंडाऱ्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत संतापाच्या भरात एका महिलेनं आपल्या दोन मुलींसह नदीमध्ये उडी घेतली. महिलेनं दोन चिमुकल्यांसह वैनगंगा नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिड्डी गावात घडली आहे. दिपाली शितलकुमार खंगार (वय २७) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

संतापाच्या भरात आईने आपल्या दोन मुलींना सोबत घेत नदीत उडी घेतल्याची ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील तिड्डी गावात घडली आहे. दीपाली शितलकुमार खंगार यांनी आपल्या देवांशी खंगार (वय ३ वर्ष) आणि वेदांशी खंगार (वय दीड वर्ष) अशा दोन मुलींना सोबत घेत नदीत उडी घेतली. या घटनेत तिघींचाही मृत्यू झाला आहे.

आईनं स्वतःसह आपल्या दोन मुलींचाही जीव घेण्याचं हे धक्कादायक पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही . तिड्डी गावातील रहिवासी दीपाली हिने आपल्या दोन मुलींसह काल रात्री १२ वाजता तिड्डी येथून जाणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कारधा पोलिसांना मिळताच पोलिसांनी शोध सुरू केला. आज सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला आहे. यानंतर लगेचच मृतदेह शवविच्छेदनाकरता भंडारा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या तपासानंतरच आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!