Just another WordPress site

केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर; शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला. मोदी शुक्रवारी रे नगरच्या उद्घाटनासाठी सोलापूरला येऊन गेले. पण रे नगरच्या गृहप्रकल्पाचा सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांना जाते अशी कोपरखळी पवारांनी मारली.

मोदींना लोकांशी खोटे बोलण्याचा अधिकार नाही; राहुल गांधींनी मोदींवर डागली तोफ 

मोदींनी भर सभेत भावुक होऊन भाषण केले मात्र मोदींनी किंवा भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. मोदी सोलापुरात येऊन रे नगर गृहप्रकल्पाचा उद्घाटन करून गेले, व्यासपीठावर थांबून मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला हा त्यांचा वैयक्तिकप्रश्न आहे. सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत. महागाई जबरदस्त वाढली आहे या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
केंद्रीय संस्था ईडीचा (ED) वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. रोहित पवारांना (Rohit Pawar) ईडीची नोटीस आल्यावर शरद पवारांनी ईडीची भीती विरोधकांना दाखवली जात आहे अशी टीका केली. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरुंगात पाठवले, सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले, हे सरकार ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

अजित पवारांच्या भाषणाकडे जास्त लक्ष देऊ नका
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील सहकारी बँकेच्या कार्यक्रमात शरद पवारांचे नाव न घेता टीका केली होती. वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत, असे अजित पवार यांनी भाषणातून खंत व्यक्त केली होती. सोलापूर शहरात असताना शरद पवारांनी अजित पवारांच्या भाषणाला प्रतिउत्तर दिले आहे. अजित पवार हे तरुणच होते, त्यांना संधी कुणी दिली. त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही, असे शरद पवारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!