Just another WordPress site

नवाब मलिक शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात जाणार? प्रफुल्ल पटेलांनी घेतली घरी जाऊन भेट

Praful Patel Met Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना दोन महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. दीड वर्षानंतर ते काल (14 ऑगस्ट) घरी परतले. राष्ट्रवादीत फूट पडल्याने नवाब मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आज (15 ऑगस्ट) अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)आणि सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. या बैठकीत काय चर्चा झाली यावर प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले. (Praful Patel met Nawab Malik they likely to join Sharad Pawar group)

■ जॉईन करा WhatsApp ग्रुप-

https://chat.whatsapp.com/FBXLw0aEtMdAHkhsUS3h95

आज माध्यमांशी बोलतांना पटेल यांनी सांगितले की, “आम्ही नवाब मलिक यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सोळा महिन्यांनंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे. आम्ही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. पुढील उपचारांची माहिती घेतली. सात्वंनाकरता, आम्ही त्यांची भेट घेतली आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगण्याकरता त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

“ते आमचे सहकारी आहेत. आम्ही 20-25 वर्षे एकत्र काम केले आहे. अशा परिस्थितीत आमच्या मित्रांना भेटणे स्वाभाविक आहे. ते बारीक झाले आहेत, वजन कमी झाले आहे. म्हणूनच माणुसकी म्हणून मित्रांना भेटायला गेलो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही ते पुढे म्हणाले.

राष्ट्रवादी फुटली तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होतील याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. याबाबत प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले, नवाबभाईंच्या प्रकृतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. नवाबभाईंना सध्या या राजकारणात आणू नये. जोपर्यंत त्यांची प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत त्यांना राजकारणात आणू नये.

छगन भुजबळ यांनी नवाब मलिक हे अजित पवार यांनाचा पाठिंबा देणार असल्याचे म्हणाले होते. सरळ सरळ त्यांनी तसा दावाच केला होता. तर नवाब मलिक हे शरद पवारांचे सच्चे कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. इतकेच नाही तर ठाकरे गटाच्या वतीनेही तसा दावा करण्यात आला होता. त्यामुळे आता नवाब मलिक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नवाब मलिक हे अजित पवार यांनाच पाठिंबा देतील, असे दावा छगन भुजबळ यांनी केला होता. तर नवाब मलिक हे शरद पवारांचे सच्चे कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवार गटाने केला. एवढेच नाही तर ठाकरे गटानेही हाच दावा केला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!