Just another WordPress site

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणारचं श्रीकांत शिंदेंशी कनेक्शन? सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग (amrita fadnavis blackmailing) प्रकरणात सध्या दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचं कनेक्शन मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी जोडलंय.

सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त मुखेड इथं त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अंधारे यांनी गंभीर आरोप केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या. किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा. ज्या अनिल जयसिंघानीच्या नावाने आरोप केले जात आहेत. त्यांच्याच जागेत श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कसं काय? ती जागा कोणाची, कोणाच्या नावावर आहे, त्याची खरेदी विक्रीची कागदपत्रं तपासा. जयसिंघानी यांची जवळीक कोणाशी? याचा तपास झालाच पाहिजे.”

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!