Just another WordPress site

Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले भारतीय वंशाचे ऋषि सुनक आहेत तरी कोण?

ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याच सरकार मधील ४० पेक्षा जास्त खासदार आणि मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर जॉन्सन यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं. बोरिस जॉन्सन यांच्यानंतर ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे प्रबळ दावेदार मानले जाताहेत. याच निमित्ताने ऋषी सुनक आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.महत्वाच्या बाबी 

१. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक प्रबळ दावेदार 

२. सुनक यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतलं उच्च शिक्षण

३. जॉन्सन सरकारमध्ये सुनक यांनी अर्थमंत्रीपद सांभाळले 

४. ऋषी सुनक यांनी  २०१४ साली केला राजकारणात प्रवेश 


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अशातच भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान पदाच्या एक पाऊल जवळ असल्याचं चित्र आहे. सुनक यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय आणि दक्षिण आशियाई वंशाचा खासदार युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. ऋषी सुनक यांचे आई-वडील त्यांच्या आजी-आजोबांसोबत ब्रिटनला गेले होते. त्यानंतर १९८० मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला. त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. तर स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं. ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशन नंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केलं आणि नंतर हेज फंड फर्म्समध्ये भागीदार बनले. सुनक यांचे लग्न भारतीय सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या  इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्तीशी २००९ मध्ये  झाला. ऋषी सुनक यांच्या वेबसाईटनुसार फिट राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि सिनेमे बघायला आवडतं. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांना अर्थसहाय्य देते. राजकारणात त्यांचा प्रवेश तसा अलीकडचाच. २०१४ साली ते रिचमंड ब्रिटीश संसदेत निवडून आले होते. पुढं २०१७ मध्ये ते पुन्हा निवडून आले होते. बोरिस सरकारमध्ये आधी ते ज्युनिअर मंत्री होते. नंतर २०१८ साली त्यांना ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर फेब्रुवारी २०२० मध्ये बोरिस जॉन्सन यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. दरम्यान, आता आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुनक हे पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात असून त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती होते का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!