Just another WordPress site

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

अहमदनगर : भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष असल्याने ‘अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा, उत्सव राष्ट्रभक्तीपर पुस्तकांच्या वाचनाचा’ या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रभक्तीपर ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हा उपक्रम अहमदनगरकरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यास अहमदनगरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दयावा. तसेच अब्दुल कलाम यांचे व्यक्तीमत्व भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी माणुस म्हणुन कसे जगावे यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये आपल्याला शास्त्रज्ञ दिसतो तसेच तेवढयाच उंचीचा लेखकही दिसतो, असे प्रतिपादन नगर महाविद्यालयाचे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे हे होते. यांनी अध्यक्षीय भाषनातुन बोलतांना सांगितले की, चरीत्र, वाचनातून तुमचे व्यक्तीमत्व अधिकाधिक मोठे होते. माणसांनी मोठे होत असताना आपले स्वतःचे व्यक्तीमत्व झाडाप्रमाणे विस्तारले पाहिजे. याचे अब्दुल कलाम हे उत्तम उदाहरण आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाचन संस्कृती रुजविने वाढविणे व टिकविण्याचे कार्य जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या मदतीने उत्तम प्रकारे सुरु आहे. तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जिवन कार्याचा परिचय उपस्थितांना करुन दिला.

प्रारंभी अहमदनगर महाविद्यालयाचे, मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तर श्री. चंद्रकांत पालवे ज्येष्ठ साहित्यिक, कवी अहमदनगर यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले. तसेच सदर प्रदर्शन शासकीय सुट्टी वगळता दि. २५/१०/२०२२ पर्यंत सकाळी १०:३० ते सायं ५:३० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरीक्षक, रामदास शिंद यांनी केले. आभार प्रदर्शन, हनुमान ढाकणे लिपिक, संतोष कापसे यांनी केले. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल, अमोल इथापे, दिपा निसळ, संदिप नन्नवरे, लक्ष्मन सोनाळे, संतोष वाडेकर आदींसह बहुसंख्य बाल वाचक व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!