Just another WordPress site

वंचितचा ‘मविआ’सोबत काडीमोड! प्रकाश आंबेडकरांची स्वबळावर लढण्याची घोषणा, उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

Prakash Ambedkar Announced Lok Sabha Candidate Name: वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेससह मित्रपक्षांच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा धक्का दिला आहे. आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी आंबेडकर यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासोबत युती करणार असल्याचेही जाहीर केले आहे. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचं स्पष्ट झालं. आंबेडकर स्वत: अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

UBT First List : ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमदेवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली संधी? 

अकोला इथं पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. येत्या लोकसभा निवडणुकीत विविध समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. वंचित बहुजन आघाडी  राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

तिकीट न दिल्यानं नामदेव उसेंडींचा भाजपात प्रवेश, विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का! 

मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर लक्षात घ्यावी, अशी विनंती  आम्ही महाविकास आघाडीला केली होती. मात्र, आमच्या म्हणण्याकडं  दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

‘भाजपने मुस्लिमांना एकटं पाडण्याचं राजकारण सुरू केलं.  त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकीतही मुस्लिम उमेदवार उभे करणार आहोत. तसेच जैन समाजातील उमेदवार उभे करू. आपण केवळ निवडणुकीत उमेदवार उभे करणार नाही तर त्यांना निवडून आणू असा निर्धारही आंबेडकरांनी व्यक्त केला.

वंचितकडून कुणाला मिळाली संधी

प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्वत: प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर, भंडारा-गोंदिया : संजय केवट, गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर : राजेश बेले, बुलडाणा : वसंतराव मगर, अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके, तर यवतमाळ-वाशीममधून  खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!