Just another WordPress site

UBT First List : ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली संधी?

Shiv Sena UBT Candidate:  भाजपनंतर (BJP) आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha Elections) पहिली यादी जाहीर केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गट 22 जागांवर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पाच विद्यमान खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchore), अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर अन्य सात मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (UBT First List)

तिकीट न दिल्यानं नामदेव उसेंडींचा भाजपात प्रवेश, विदर्भात कॉंग्रेसला मोठा धक्का! 

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.

मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे:
1) बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
2) यवतमाळ-वाशीम – संजय देशमुख
३) मावळ – संजय वाघेरे
४) सांगली – चंद्रहार पाटील
५) हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
६) संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
7) धारशिव – ओमराजे निंबाळकर
8) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
९) नाशिक – राजाभाऊ वाजे
10) रायगड – अनंत गीते
11) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
12) मुंबई – ईशान्य – संजय दिना पाटील
13) मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
14) मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तिकर
15) मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
16) परभणी – संजय जाधव
17) ठाणे – राजन विचारे

कल्याणमध्ये कोणाला मिळणार उमदेवारी?
ठाकरे गटाने आज लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र चार ते पाच जागांवरील उमदेवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गट केदार दिघे यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याणमध्ये लोकसभेत ठाकरे यांच्याकडून कोण निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सांगलीत ठाकरे गटच लढणार
संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला होता. मात्र, काँग्रेसने जागा सोडण्यास नकार दिल्याने या जागेवरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू होती. मात्र मिरजेत झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता आज जाहीर झालेल्या अंतिम यादीत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. अशा स्थितीत काँग्रेस आता काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!