Just another WordPress site

ओह माय गॉड! रेल्वे प्रशानसनाने थेट भगवान बंजरंगबलीलाच पाठवली नोटीस, अनेकांना आश्चर्य

धनबादः गेल्या काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये मनोरंजक पद्धतीने देवावरील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक सांगण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये एका सामान्य व्यक्तीने चक्क देवाविरुद्ध खटला दाखल केला होता. सध्या असाच काहीसा प्रकार झारखंड येथील धनबाज जिल्ह्यातून समोर आला आहे.  मात्र येथे फरक असा आहे, की कोणत्याही सामान्य व्यक्तीने नाही, तर खुद्द भारतीय रेल्वेनेच देवाला नोटिस पाठवली आहे. त्यामुळं आश्चर्च व्यक्त केले जात आहे. दहा दिवसांत मंदिर हटवण्यात यावं आणि रेल्वे विभागाला जमीन सोपवण्यात यावी, असं नोटिशीत म्हटलं आहे.

शहरातील बेकार बांध परिसरात असलेल्या मंदिरात चिटकवण्यात आली आहे. यात थेट भगवान हनुमानांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंदिराने अतिक्रमण करत रेल्वेच्या जमिनीचा ताबा घेतला आहे. तसंच, येथील स्थानिकही अनधिकृतपणे या जागेवर राहत असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. त्यामुळं १० दिवसांच्या आत ही जागा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहेत. अन्यथा, मंदिर तसेच स्थानिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे. १९३१ साली बांधण्यात आलेले हनुमानाचे मंदिर आहे. तेव्हापासूनच येथील स्थानिक या मंदिरामध्ये दैनंदिन पूजापाठ करतात.

दरम्यान, रेल्वेच्या नोटिशीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मंदिराजवळच वस्ती असून तिथे जवळपास पाच डझन लोकांना अतिक्रमण विरोधात नोटिस पाठवली आहे. त्याचवेळी तिथे असलेल्या हनुमान मंदिरालादेखील अतिक्रमण असल्यास नोटिशीत म्हटलं आहे.

अतिक्रमण हटवण्याची नोटिस आलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ते तिथे १९२१पासून राहतात. फळं, मासेमारी, भाज्यांसह अन्य छोटे-मोठे व्यवसाय करुन ते आपला उदरनिर्वाह चालवतात. मंगळवारी नोटीस मिळाल्यानंतर वस्तीतील सर्व रहिवाशी मंदिराभोवती जमले होते व रेल्वेच्या नोटिशीचा विरोध केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!