Just another WordPress site

निसर्ग कोपला! पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप, हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

बीड : पावसाने जुलै महिन्यात चांगलंच कमबॅक केलं होतं. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या होत्या. पण राज्यातील बहुतांश भागात असा मुसधार पाऊस झाला की, पिके पाण्यात गेल्याचं चित्र होतं. दरम्यान, आता पिके माल धरण्याच्या अवस्थेत असतांना पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. जमिनीतली ओल आटल्याने पिकांचे भविष्य अंधकारमय झालेय. यामुळे शेतकरी मात्र पुरता धास्तावला.

 

महत्वाच्या बाबी

१. आता पावसाने दडी मारल्यानं पिके करपू लागली
२. शेतातील पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत
३. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी
४. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा

 

यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पेरण्या केल्या. नंतर जुलै-ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळं शेतकरी आनंदी होता. मात्र, आता पुन्हा पावसाने चांगलीच दडी मारल्यानं शेतकऱ्यांची पिकं करपू लागल्याचं बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातलं चित्र आहे.
दरवर्षी शेतकरी एकच विचार करून शेतात पेरणी करतो की या वर्षी चांगले उत्पन्न होईल आणि देणे करांचे देणे होईल. मात्र, असं होत नाही. दरवर्षी अनेक संकटाचा सामना करता करता बळीराजा मेटाकुटीस आला. मागील वर्षी कापसाला भाव बरा होता. मात्र, बोंड अळीमुळे उत्पन्नात घट झाली परिणामतः भाव जास्त असला तरी उत्पन्न जास्त घेता आले नाही. यावर्षी तर फार वाईट अवस्था आहे. जुलैमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले. परिणामी, शेकडो हेक्टरवर पेरणी केलेले बियाणं, खतं वाया गेल्यानं अगोदर आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडला. दुबार पेरणी केल्यानंतर जुलैमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना समाधान लाभले. त्यामुळं दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र हा पाऊस जवळपास महिनाभर चांगलाच कोसळल्यानं हाहाकार निर्माण झाला. त्यामुळं शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आधीच पावसाअभावी पेरण्या उशीरा झाल्या. त्यातच बुरशीजन्य रोगराईमुळे पिके संकटात सापडली होती. अशात आता बीड जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यामुळं शेतकऱ्यांनी शेकडो स्वप्न उराशी घेऊन केलेली पेरणी मात्र आता धोक्यात आली आली. कारण, पिकांना माल पकडण्याच्या अवस्थेत शेतकऱ्याला दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र पाऊस आता दडी मारून बसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले. मध्यंतरी एक ते दीड महिन्याचा पावसाने खंड दिल्यामुळे आणि जोमात आलेली पिके पूर्णतः निस्तनाबूत झाली. पावसाने दडी मारल्यानं पिके करपू लागल्याचं शिवारात चित्र आहे. त्यामुळं शेतकरी पुरता हताश झाला.
बीड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या दोन दिवसात पाऊस पडला नाही, तर खरीप हंगाम वाया जाऊ शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करताहेत. त्यामुळं शासनाने ही भीषण परिस्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होतेय.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!