Just another WordPress site

National Farmers Day : राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो?

भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘शेती’ आणि शेतकरी हा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. शेतकरी हा उभ्य जगाच पोशिंदा आहे. आज शभरात ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जाताहेत. मात्र,  २३ डिसेंबरलाच का साजरा केला जातो, हा ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ याविषयी जाणून घेऊया. हायलाईट्स

१. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती आणि शेतकरी हा कणखर कणा 

२. चौधरी चरण सिंह यांनी घेतले होते शेतकरी हिताचे निर्णय 

३. चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा 

४. सरकारनं बळीराजाला मदतीचा हात देणं गरजेचं


भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा आज जन्मदिवस. चरण सिंह यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. चौधरी चरण सिंह हे अगदी अल्प काळ पंतप्रधानपदावर राहिले. मात्र, त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक परिश्रम घेतले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनाही सुरू केल्या. शेतकरी सुधारणांची बिले आणून देशाच्या कृषी क्षेत्रात  त्यांनी महत्वाची बजावली. याशिवाय,  त्यांनी राष्ट्रीय कृषी आणि  ग्रामीण विकास बँकेची अर्थात, नाबार्ड स्थापना केली. त्यामुळं भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय चौधरी चरण सिंह यांना जाते. चौधरी चरण सिंह हे  शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या आणि परिस्थितीची उत्तम जाण होती. त्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक सुधारणा केल्यात.  दरम्यान, त्यांच्या या योगदानासाठी  भारत सरकारने २००१ पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे समाजातील महत्त्व आणि देशाचा सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी किसान दिन साजरा केला जातो. देशाच्या संसदेत शेतकऱ्यांसाठी चौधरी चरण सिंह आवाज बुलंद केला होता. चौधरी चरण सिंह हे २८ जुलै १९७९ पासून १४ जानेवारी १९८० पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. यादरम्यान त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले.  त्यांनी तयार केलेला जमीनदारी उन्मुलन विधेयक राज्याच्या कल्याणकारी सिद्धांतावर आधारित होता. यामुळे उत्तर प्रदेशात एक जुलै १९५२ पासून जमीनदारीची प्रथा संपली. याचबरोबर, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवले. पुढं ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली. चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांच्यावर महात्मा गांधींजींचा प्रभाव होता. त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होतं. त्यांनंतर त्यांनी  गाझियाबादमध्ये काही काळ वकिली केली. त्यांनी गाझियाबादमध्ये काँग्रेस समिती स्थापन केली होती. गांधीजींनी मीठासाठी केलेल्या दांडी यात्रा काढली होती. तेव्हा चरण सिंह यांनीही हिंडनमध्ये मीठाचा कायदा मोडला होता. यासाठी त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा देशसेवेच्या कामात सक्रिय झाले. दरम्यान, देशाच्या प्रगतीत शेतकर्‍यांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना सन्मान दिला पाहिजे. आज एकीकडे भारत महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. देशभरात ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ साजरा होतो. शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते. मात्र, सध्या याच बळीराजाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती असेल,  किंवा राजकीय निष्क्रियता असेल. यामुळे देशातील शेतकरी हवालदिल असून देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. मात्र, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवं. शिवाय, सरकारनं बळीराजाला मदतीचा हात देणं  गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या पाहीजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणं सोप होईल

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!