Just another WordPress site

लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात, ८० हजाराची लाच स्विकारतांना अटक

गोंदिया : तक्रारकर्त्याच्या कुटूंबाच्या नावावर असलेल्या गोंदिया शहर हद्दीतील घराचे अकृषक परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द झाली. भुखंडाची गुंठेवारी (एनए) करून देण्यासाठी ८० हजाराची लाच (Bribe)मागितली. दरम्यान ३० हजार रूपये घेवून ५० हजार रूपये पुन्हा लाच घेण्याच्या प्रयत्नात असलेला पालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असलेला लिपिक रंगेहात जाळ्यात अडकला. ही कारवाई काल (ता. २१) गोंदिया लाचलुचपत विभागाने (Gondia Bribery Department) केली. अब्दुल सलाम वल्द हबीब कुरैशी (रा. सिव्हील लाईन, गोंदिया) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. (Municipal clerk arrested while accepting bribe of 80 thousand, Gondia ACB action)

सविस्तर वृत्त असे की, तक्रारकर्ता व त्याच्या आई-बहिणीच्या नावावर गोंदिया नगर परिषद क्षेत्रात घर आहे. या घराची अकृषक वापराची परवानगी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशाने रद्द झाली. या रद्द झालेल्या भुखंडाचा गुंठेवारी (एनए) करून देतो म्हणून पालिकेच्या नगर रचना विभागात कार्यरत असला वरिष्ठ लिपीक अब्दुल सलाम वल्द हबीब कुरैशी (५१) याने तक्रारकर्त्याशी संपर्क साधला. दरम्यान एन करून देण्यासाठी त्याने ८० हजार रूपयाची लाच मागितली. त्यातील त्याने ३० हजार रूपये देखील घेतले. मात्र पैसे घेऊनही कामे करण्यास तो टाळाटाळ करू लागला. उर्वरित ५० हजार रूपये दिले नाही तर कामे करणार नाही, असं सांगून तो एन करून देण्यास टाळाटाळ करू लागला. तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने या बाबीची तक्रार गोंदिया लाचलुचपत विभागाकडे केली.

लाचलुचपत विभागाने तक्रारीची शहनिशा करून सापळा रचला. तक्रारकर्त्याकडून आरोपीने ५० हजार रूपये लाच प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून लाचलुचपत विभागाने आरोपी अब्दुल सलाम वल्द हबीब कुरैशी (५१) विरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला. व आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पो. नि. अतुल तवाडे, विजय खोब्रागडे, संजय बोहरे, नापोशी संतोष शेंडे, अशोक कापसे, कैलास काटकर, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, दीपक बतबर्वे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!