Just another WordPress site

“आईला वाटायचं मी बाथरुममध्ये मुलांबरोबर…” जान्हवी कपूरने केलं आई श्रीदेवी बद्दल मोठं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमीच कनेक्टेड राहते. जान्हवी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रत्येक गोष्टीची अपडेट चाहत्यांना देते. नुकताच जान्हवीने तिच्या घराची एक व्हिडीओ टूर चाहत्यांना घडवली. ‘वोग’ने आपल्या युट्यूबवर जान्हवीची ही ‘होम टूर’ शेअर केली. यात जान्हवीने तिचा बेडरूम देखील चाहत्यांना दाखवला. सोबतच तिने या घराबद्दल अनेक खुलासे देखील केले. यावेळी तिने आपल्या घराच्या बाथरूमला लॉक नसल्याचे सांगितलं.

‘वोग’ने जान्हवीच्या चेन्नईस्थित घरातील एक इनसाईड व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर आपल्या संपूर्ण घराची झलक चाहत्यांना दाखवत आहे. यावेळी ती घरातील प्रत्येक कोपऱ्यातील आठवणी सगळ्यांना सांगतेय. या घराशी तिच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. हे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यानी खरेदी केलेलं पहिलं घर आहे. जान्हवी आणि खुशीचं बालपण याच घरात गेलं आहे. याच घरात श्रीदेवी यांचे पहिले पेंटिंग देखील आहे.
जान्हवी कपूरचे चेन्नईतील हे घर खूपच आलिशान आहे. याच घरात श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या लग्नाचे फोटो देखील आहेत. सोबतच खुशी आणि जान्हवीचच्या बालपणीचे फोटो देखील आहेत. या आठवणी सांगताना जान्हवी खूप भावूक झालेली दिसली. यावेळी तिने या घरातील आपली बेडरूम देखील चाहत्यांना दाखवली आणि याच्याशी संबंधित एक किस्सा देखील सांगितला.
जान्हवी म्हणाली, “माझ्या आईसाठी हा बंगला खरेदी करणं फार कठीण होतं. तिच्या लग्नानंतर तिला हा बंगला डेकोरेट करायचा होता. जगभरातील ज्या ठिकाणांना तिने भेटी दिल्या. त्या ठिकांणाहून आणलेल्या वस्तूंनी तिला हा बंगला सजवायचा होता”. जान्हवीने वोग इंडियासह बनविलेल्या या व्हिडीओमध्ये श्रीदेवींबरोबरची तिची आठवण सांगताना वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलासा केला.
“बंगल्यातील माझ्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही आहे. कारण आई मला कधीच बाथरुमचा दार बंद करुन द्यायची नाही. मी बाथरुममध्ये जाऊन मुलांबरोबर बोलेन अशी तिला भीती वाटायची. बंगल्यातील माझ्या रुममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही रुममधील बाथरुमला लॉक लावलेलं नाही”, असं जान्हवी म्हणाली. ही आठवण शेअर करताना जान्हवी आई श्रीदेवीच्या आठवणीत खूपच भावूक झाली. आजही ती प्रत्येक क्षणी आपल्या आईच्या आठवणीत रमते.

पहा व्हिडीओ : 

जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तिच्या आगामी बवाल चित्रपटात ती अभिनेता वरुण धवनसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट २०२३च्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!