Just another WordPress site

अमिताभ बच्चन यांच्या घरातील खास सदस्याचं निधन, भावूक पोस्ट शेअर करत म्हणााले, “असं मध्यावरच सोडून जाणं….”

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या रोजच्या आयुष्यात काय घडतंय, याची अपडेट ते ब्लॉग आणि ट्वीटच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या घरातील एका खास सदस्याच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. बिग बींच्या घरातील हा खास सदस्य आहे त्यांचा पाळीव श्वान. ही पोस्ट शेअर करताना अमिताभ बच्चन भावूक झालेले पाहायला मिळाले.

अमिताभ बच्चन यांचा हा पाळीव श्वान गेली अनेक वर्षे त्यांच्या कुटुंबासोबत होता. बच्चन कुटुंबातील सगळ्यांचेच त्याच्यावर विशेष प्रेम होते. त्याच्या निधनामुळे बच्चन कुटुंबातील प्रत्येकालाच दुःख झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी देखील पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी या पोस्टमध्ये आपल्या या पाळीव श्वानासोबत दोन फोटो शेअर केले आहेत.

या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांचा पाळीव श्वान दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा चिमुकला मित्र आण त्याच्याबरोबरचे सुंदर क्षण. एक दिवस ते मोठे होतात आणि आपल्याला सोडून निघून जातात’. अमिताभ बच्चन आणि या पाळीव श्वानात असलेलं खास बॉडिंग या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. ही पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन भावूक झालेले पाहायला मिळाले.

वयाच्या ८०व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये सक्रिय असणारे अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय आहेत. ते नियमित ब्लॉग देखील लिहितात. या ब्लॉगमधून ते अनेक आठवणींना उजाळा देतात. शिवाय आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ते ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करतात. आज देखील त्यांनी ब्लॉग लिहित आपल्या श्वानाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘आमच्या छोट्या मित्राचं आम्हाला असं मध्यावरच सोडून जाणं आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे. त्याच्या अशा जाण्यानं आम्हाला खूप दु:ख झालं आहे. तो आमच्या आजूबाजूला असायचा, तेव्हा खूप आनंदी वातावरण असायचं’.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!