Just another WordPress site

आज करोडो रुपये छापतोय, पण सलमानची पहिली कमाई किती होती? आकडा ऐकून चकित व्हाल

गेल्या अनेक वर्षांपासून जो केवळ बॉक्स ऑफिसवर; नाही तर सर्वसामान्य चाहत्यांच्या मनावरही राज्य करतोय अशा बॉलीवूडच्या भाईजानचा आज ५७ वा वाढदिवस. सलमानने काल रात्री त्याचे नातेवाईक आणि जवळची मित्र मंडळींबरोबर आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. त्याचे चाहतेही त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसताहेत. अनेक वर्ष सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. आज कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या सलमान खानची पहिली कमाई ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सलमानने अनेक हिट चित्रपट दिले. आता देखील अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याचं नाव झळकतंय. सलमान खानचे चित्रपट म्हटलं की बॉक्स ऑफीवर कोटींची उलाढाल हे समिकरण ठरलेलं आहे. त्याचे चित्रपट कोट्यवधी रुपये कमवतात आणि प्रेक्षकांच्या हृदयावर एक वेगळी छाप सोडतात. २२ वर्षांहून अधिक काळ सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करतोय आणि आलिशान जीवन जगतोय. सलमान खान दोन ते तीन वर्षांपूर्वी फोब्सच्या यादीतही होता. १०० ते २०० कोटींचे मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही त्याची चर्चा होती. आज भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक श्रीमंत अभिनेता म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख होतो. तो आपल्या एका सिनेमासाठी किती कोटी पैसे घेतो, याचा आकडा त्याच्या चाहत्यांना सांगण्याची गरज नाही. तो आता थेट टक्केवारीत बोलतो. त्याचा कोणताही चित्रपट १०० कोटींच्या पुढे सहज जातो म्हणून भागीदारीत पैसे घेतो. सलमान बिग बॉसच्या प्रत्येक शो साठी ६.५ कोटी रुपये घेतोय. मात्र हे झाले आताचे, ज्यावेळी सलमाननं त्याचा पहिला सिनेमा साईन केला त्यावेळी त्याला मिळालेलं फारच कमी मानधन मिळालं होतं.
सलमाननं १९८९ मध्ये ‘वा बेवी हो तो ऐसी’च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, हे खरं असलं तरी त्याचा मुख्य कलाकार म्हणून पहिला चित्रपट होता मैंने प्यार किया. सलमानचा हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामुळे त्याला ओळख मिळाली. ‘मैनै प्यार किया’ या त्याच्या पहिल्या सुपरहिट सिनेमासाठी त्याला ३१ हजार रुपये मानधन मिळालं होतं.
मात्र, या सिनेमाआधीही काम मिळवण्यासाठी सलमान खूप प्रयत्न करत होता. त्यावेळी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचला. हे काम करण्यासाठी त्याला ७५ रुपये मिळाले होते. हे ७५ रुपये म्हणजे त्याची पहिली कमाई होती, असं काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सलमानानं सांगितलं होतं. ७५ रुपयांपासून झालेली ही सुरुवात ते आज काही कोटींचा मालक हा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
सलमाननं ‘मैने प्यार किया’,’साजन’,’हम आपके है कौन’,’करण-अर्जुन’,’जुडवा’,’प्यार किया तो डरना क्या’,’दबंग’,’बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’,’बजरंगी भाईजान’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे केलेयत. सलमान आज करोडो कमावतोय. अभिनेता होण्याव्यतिरिक्त तो एक उत्तम व्यावसायिक देखील आहे. सलमानचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्याचं नाव आहे सलमान खान फिल्म्स. सलमानचा स्वतःचा ब्रान्ड देखील आहे, जो बीइंग ह्युमन नावानं प्रसिद्ध आहे. या सगळ्याच माध्यमातून सलमान तगडी कमाई करतो. याशिवाय, ब्रॅन्ड एंडोर्समेंट मधूनही तो करोडो रुपये कमावतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!