Just another WordPress site

‘प्रत्येक हिंदूंनी घरात शस्त्र ठेवावीत, नाहीतर..’, प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी हिंदूंना घरात शस्त्रे ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लव्ह जिहादबाबत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. यामुळे पुन्हा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या प्रज्ञा ठाकूर?

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रज्ञा ठाकूर लव्ह जिहादबाबत हिंदूंना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. लोकांनी भाजी कापण्यासाठी चाकू धारदार ठेवावा, जेणेकरून संधी मिळेल तेव्हा शत्रूंचे मुंडकेही सहज कापता येतील, असं प्रज्ञा ठाकूर व्हिडीओत म्हणता आहेत, हा व्हिडीओ कर्नाटकातील एका कार्यक्रमातील आहे.

घरात शस्त्रे ठेवण्याचा दिला सल्ला

“हिंदूंना त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणार्‍यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. प्रत्येक हिंदुंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवली पाहिजे, जर मिळत नसतील तर, घरात किमान भाजीपाला कापण्याचा धारधार चाकू तरी ठेवावा, कधी कोणती परिस्थिती येईल हे सांगता येत नाही, प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आमच्या घरात घुसून आमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे’, असं विधान प्रज्ञासिंह ठाकूर करताना दिसून येत आहे.

दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेलं हे भडकाऊ विधान सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत टीका केली आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्यात फूट पाडण्याचं काम करू नका, असं नेटकरी म्हणताना दिसून येत आहेत. तर काहींनी त्यांच्या या विधानावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापूर्वी देखील वादग्रस्त विधानं केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!