Just another WordPress site

मेस्सीकडे आहेत प्रायव्हेट जेट अन् महागड्या कार, प्रत्येक तासाला कमावतोय ७ लाख रुपये, पाहा किती आहे मेस्सीची संपत्ती?

फुटबॉल चाहत्यामध्ये लिओनल मेस्सीची क्रेझ कायम आहे. त्याच्या खेळावर जगभरातील फॅन्स फिदा आहेत. रविवारी मेस्सीने आपल्या संघ अर्जेंटिनासोबत वर्ल्ड कप जिंकला. या स्टार फुलबॉलरची मैदानावरची कामगिरी जशी सरस आहे, तसेच मैदानाबाहेरचं त्याचं आयुष्य जोरदार आहे. तो दिलखुलास आयुष्य जगतो. त्याची जीवनशैली हेवा वाटावं अशीच आहे. मेस्सी हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. दरम्यान, मेस्सीची एकून संपत्ती तरी किती आहे? याच विषयी जाणून घेऊ.

जगभरामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीचे चाहते आहे. त्यानं आपल्या खेळानं चाहत्यांना भारावून टाकलं असून आपल्या खेळामुळे तो फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. गेल्या काही वर्षांपासून मेस्सीच्या लोकप्रियतेमध्ये आणि त्याच्या कमाईमध्ये कमालीची वाढ झालीये. ३५ वर्षीय मेस्सीला २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून निवडण्यात आलं. त्याने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षा जवळपास १५० कोटींची अधिक कमाई केली.

नोव्हेंबर २०२२ पर्यंत लिओनल मेस्सीकडे एकूण ६०० मिलियन डॉलर म्हणजे, ४९६० कोटींची संपत्ती आहे. यात कोट्यवधीचं घरं, पर्सनल जेटही सामिल आहे. इबीसा, बार्सिलोना, रोसारियो आणि मियामी सारख्या शहरात त्याची घरं आहेत. या संपत्ती कित्येक कोट्यवधींच्या आहेत आणि सर्व आधुनिक सुविधांसह आहे. जगभरातील त्याच्या घरांची एकूण किंमत जवळपास २३४ कोटी रुपये आहे. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडुंमध्ये टॉपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीची वर्षाची कमाई जवळपास ६११ कोटी रुपये इतकी असून तो प्रत्येक तासाला सात लाख कमाई करत असल्याची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे, मेस्सी हा केवळ त्याच्या खेळातूनच नाही तर हॉटेल इंडस्ट्रीतूनही कमाई करतो. Ferrari 335S स्पाइडर स्कॅग्लिएटी पासून ते Maserati GranTurismo MC Stradale पर्यंत मेस्सीकडे सुपरकार्स आहेत. मेस्सीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन या कार्स दिसतात. सुपरकार्ससह मेस्सीकडे प्रायव्हेट जेटही आहे. याची किंमत जवळपास २५२ कोटी रुपये एवढी आहे. सर्व आधुनिक सुविधांसह असलेल्या प्रायव्हेट जेटमधून त्याच्या कुटुंबीयांसोबत तो अनेकदा पाहायला मिळतो. जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलर्सपैकी एक असणाऱ्या मेस्सीने एक महागडी बोट खरेदी केल्याची माहिती आहे. मॅओरा सेवन नावाची बोट खरेदी करण्यासाठी त्याने तब्बल १० मिलियन डॉलर खर्च केले होते. या बोटमध्ये चार बेडरुम, एक व्हिआयपी खोली तसंच इतर अनेक आधुनिक सुविधा आहेत. मेस्सीनं यंदाच्या वर्षी एका सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून डील साईन केली होती. त्यामध्ये त्या कंपनीला त्याला दरवर्षी २० मिलियन डॉलर द्यावे लागत होते. यावरुन मेस्सी हा किती महागडा सेलिब्रेटी आणि खेळाडू आहे हे लक्षात येतं. दरम्यान, आता तर त्यानं वर्ल्ड कपवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. त्यामुळे पुन्हा त्याचा भाव वाढणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!