Just another WordPress site

जळगावमध्ये बसस्थानक परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाची निर्घृण हत्या, दोन जण गंभीर

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. अशातच पुन्हा एकदा जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. आकाश सुरेश सपकाळे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक येथे जुन्या वादाच्या कारणावरून दोन तरुणांच्या गटात तुफान हाणमारी झाली. यावेळी एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात आकाश सुरेश सपकाळे या तरुणाचा खून झाला. तसेच आकाशचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि त्याचा मित्र सागर आनंदा सपकाळे यांच्यावरही वार केल्याने ते दोन जण जखमी झाले. या दरम्यान जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हत्या करण्याचे नेमके खरे कारण समोर आलेले नसून जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. तरूणावर वार करणारा आण्णा उर्फ गोपाळ कैलास सैंदाणे याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. एकीकडे जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे जळगावात घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!