Just another WordPress site

मालेगाव एसटी बस स्थानकात कायमस्वरूपी नियंत्रक नाही; लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय

Malegaon ST Bus Station : मालेगाव शहरातील एसटी बस स्थानकावर कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक नाही. शिवाय, बस स्थानक अनेक समस्यांनी ग्रस्त असताना या ठिकाणी कायमस्वरूपी २ वाहतूक नियंत्रकची नेमणूक करण्यात यावी, तसेच बस स्थानकावर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातर्फे केली जात आहे. दरम्यान, याकडे अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षाही प्रवाशांची आहे. (Malegaon ST Bus Station does not have a permanent controller; Passenger inconvenience)

मालेगाव येथील बस स्थानक हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. दिल्लीहैदराबाद महामार्गावर असणाऱ्या या बस स्थानकावर दररोज शेकडो एसटी बसेस ये-जा करतात. येथून मेहकर,जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई, शिर्डी तसेच वाशिम, हिंगोली, नांदेड, हैदराबाद, भोकरदन, पंढरपूर व पुसद, माहूर करिता बसेस जातात तर दुसरीकडे या ठिकाणाहून अकोला, अकोट, परतवाडा, रिसोड, सेनगाव, जिंतूर, परभणीकडे व नागपूरकरिता कारंजा, वर्धा, अमरावती, यवतमाळ मार्गे बसेस धावतात. अशा महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या या बस स्थानकावरून असंख्य बसेस जात असताना मात्र या बस स्थानकावर कोणती सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी बस स्थानकात दोन वाहतूक नियंत्रकांची गरज असताना मात्र मालेगावला एक सुद्धा कर्मचारी वेळेवर येत नाही. त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या बसची माहिती प्रवाशांना मिळत नाही व त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.

अनेक बसेस या परस्पर सेलू फाट्यावरून निघून जातात. कारण वाहतूक नियंत्रक नसल्याने वाहन चालकावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण राहत नाही. वाहतूक नियंत्रका बरोबरच या ठिकाणी बसेसची माहिती देण्याकरिता लाऊ स्पीकरची व्यवस्था नाही. त्याचबरोबर बस स्थानकात अस्वच्छता पसरलेली असून या ठिकाणी पिण्याचे पाणीही सोय प्रवाशांसाठी नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह बरोबर नाही अशा एक नवे अनेक समस्यांनी हे बसस्थानक ग्रस्त असताना मात्र याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे सपसेल दुर्लक्ष झालं आहे. याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तरी महत्त्वाच्या असणाऱ्या या बस स्थानकावर प्रवाशांना होणारी असुविधा व त्रास लक्षात घेता या बसस्थानकावर कायमस्वरूपी दोन वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात यावी. त्याचबरोबर बस स्थानकावर आवश्यक त्या सुविधा या तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी प्रवासी वर्गातर्फे केल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!