Just another WordPress site

महावितरणकडून वीज यंत्रणेपासून सुरक्षितता व सतर्कतेचे आवाहन

अकोला : जीवनामध्ये विजेचे महत्त्व व फायदे अत्यावश्यक आहेच, मात्र सावधानता बाळगली नाही तर नुकसानही होऊ शकते. सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. वादळी व संततधार पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीज तारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात (Electrical accident) होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीज यंत्रणा व उपकरणांपासून सावध राहावे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी करण्यात आलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. (Mahavidran calls for safety and vigilance from the power system)

दैनंदिन वीज महत्त्वाच्या बाबी :
१. वीजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही उपकरणे बंद करून, ते कनेक्शनपासून बाजूला करावीत. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

२. जमिनीवर तुटून पडलेल्या वीज तारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणाऱ्या तारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.

३. पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा विजांचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

४. कपडे वाळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावला. कारण अनवधानाने ही तार वीज प्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना तारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका, विद्युत वाहिनीखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका, विद्युत खांब किंवा तणाव – ताराला गुरेढोरे बांधू नका.

५. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका, तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका, विजेच्या अनधिकृत वापर टाळा, विशेषतः विद्युत मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी.

६. घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

७. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. वीज उपकरणे हाताळतांना पायात स्लीपर चप्पल घालावी व वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री करावी, विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास वीज कंपनीला माहिती द्यावी, जेणेकरून तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.

८. मेन स्विचमध्ये फ्युज वायरच असावी घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्युज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो.

घरातील वायरिंग जुने झाले असल्यास ते बदलून घ्यायला पाहिजे. घरात ओल येत असल्यास तसेच वायरिंग जुने झाले असल्यास लिकेज करंटची समस्या वाढते. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. टी. व्ही. नेहमी बोर्डवरील स्वीच बंद करूनच बंद करावा. आकाशात वीज चमकत असल्यास स्वीच बंद करून प्लग पीन देखील काढून ठेवावी म्हणजे होणारे नुकसान टळेल.

येथे नोंदवा तक्रार
वीज सेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा तक्रार देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणाऱ्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२- ३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे अॅप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाईलवरून महावितरणच्या ०२२-५०८९७१०० क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तक्रार नोंदविल्या जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!