Just another WordPress site

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर, 10 मार्चला वितरण, आशुतोष गोवारीकरांसह पाच जणांचा होणार सन्मान

Kusumagraj Foundation Award : प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आशुतोष गोवारीकर(Ashutosh Gowariker), महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन अर्थात ‘एमकेसीएल’ची स्थापना करणारे विवेक सावंत, भरतनाट्यम क्षेत्रातील गुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांच्यासह सहा जणांना येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Foundation) वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय स्तरावरील ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. मंगळवारी येथे प्रतिष्ठानचे पदाधिकारी अॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, अजय निकम, कार्यवाह मकरंद हिंगणे, गुरुमित बग्गा यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

CAA Act येत्या 7 दिवसांत देशात लागू होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान 

प्रतिष्ठानतर्फे १९९२ पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. पुरस्काराचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात येते.

ज्ञान या गटात तंत्रज्ञान व नेटवर्किंग क्षेत्रात शिक्षणक्रांती घडविणाऱ्या विवेक सावंत यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. चित्रपटासाठी उत्कृष्ट कलानिर्मितीचा ध्यास असणारे दिग्दर्शक व निर्माता आशुतोष गोवारीकर, नृत्यासाठी भरतनाट्यम कलावंत तथा अभ्यासक डॉ. सुचेता भिडे-चापेकर, लोकसेवेसाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक डॉ. शमसुद्दीन तांबोळी, शिल्प-चित्र गटात शिल्पकार प्रमोद कांबळे तर क्रीडा क्षेत्रासाठी पत्रकार सुनंदन लेले यांना पुरस्कार दिला जाणार आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!