Just another WordPress site

राजकीय दबावातून ईडी चौकशी, तब्बल ९ तासांनंतर बाहेर येवून रवींद्र वायकरांची सरकारवर टीका

मुंबई : माझी राजकीय दबावातून कुठलाही पुरावा नसताना ईडी (ED)चौकशी करण्यात आली. सत्तेतील सरकारचे हे सुडाचे राजकारण चालू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांनी केली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर, 10 मार्चला वितरण, आशुतोष गोवारीकरांसह पाच जणांचा होणार सन्मान 

जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर यांच्याविरुद्ध ९ जानेवारी रोजी ईडीने कारवाईचा फास आवळला होता. यानंतर इंडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र पहिल्या समन्सला हजर न राहता वायकर सोमवारी हजर राहिले. यावेळी वायकर यांची ईडीकडून तब्बल १ तास चौकशी करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास सोडले आहे.

CAA Act येत्या 7 दिवसांत देशात लागू होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान 

वायकर ससोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडीच्या बॅलाई पीवर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आणि रात्री नऊ वाजता कार्यालयाबाहेर पडले. यानंतर माध्यमांशी बोलताना वायकर म्हणाले की, ईडीने माझ्या घरी जेव्हा धाड टाकली तेव्हा त्यांनी सांगितले की, सुप्रिमो क्टीव्हिटी सेंटर बांधले त्या अनुषंगाने २००२ पासून ते आतापर्यतचे कागदपत्र आम्हाला पाहिजे. १९ वर्षांचे कागदपत्र एका आठवडयात देणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतला. एक तर माझी तब्येत बरी नव्हती आणि एवढ्या कमी वेळात कागदपत्र जमवून आणून देणे शक्य नव्हते. तसेच इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार ७ वर्षापर्यंत कागदपत्र देणे गरजेचे आहे. परंतु त्यांनी १९ वर्षाचे कागदपत्र एकदम मागितल्याने मला कागदपत्र द्यायला वेळ लागला. परंतु आज त्यांनी मला चौकशीसाठी बोलावले होते त्यानुसार मी आज चौकशीसाठी आलो होतो, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!