Just another WordPress site

ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, नव्या कुस्ती महासंघाची मान्यता सरकारकडून रद्द, संजय सिंहना हटवलं

नवी दिल्ली- केंद्र सरकारने नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द (Cancellation of recognition of wrestling federation) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष आणि ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे.

संजय सिंह (Sanjay Singh ) यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी प्रचंड विरोध केला होता. ब्रिजभूषण यांच्या जवळच्या माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी झाल्यानं साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. नव्या कार्यकारिणीच्या उपस्थितीत मी कुस्ती खेळणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयांना निवडणुकीला उभे राहायला देऊ नका, कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी महिला व्यक्तीची निवड करावी, जेणेकरून पुन्हा लैंगिक शोषणाचा प्रकार घडणार नाही आणि महिला भयमुक्त खेळू शकतीत, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली होती. पण ती विनंतीही मान्य करण्यात आली नव्हती. त्यामुळं नाराज झालेल्या साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्त होण्याची घोषणा केली.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ४८४ जागांवर भरती सुरू 

तर कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले होते. वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्याचं सांगण्यात येतंय. अशातच आता नव्याने नियुक्त कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आलीये.

सुमारे वर्षभरापूर्वी कुस्ती संघटनेच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये ब्रिजभूषण सिंह यांचा दबदबा दिसून आला. महत्वाच्या पदांवर आपल्याच माणसांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यांच्यावर कारवाईची मागणी करत कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर मोठे आंदोलन केले होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!