Just another WordPress site

कालीचरण महाराज यांनी आतापर्यंत कोण कोणती वादग्रस्त वक्तव्ये केली?

कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालीचरण महाराज या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्याला कारण होतं कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळालेत होते. मोठ्या गदारोळानंतर कालीचरण महाराजांना अटक झाली होती. दरम्यान, कालीचरण महाराजांनी आजवर कोण कोणती वादग्रस्त वक्तव्यं केली? याच विषयी जाणून घेऊ.

‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत एक तरुण साधू ‘शिवतांडव स्तोत्र’ गात होता. तरुण साधूचा आवाज, त्याची स्टाईल पाहून व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. अनेकांना वाटलं की हा साधू वाराणसी, किंवा कुठल्या तरी उत्तरेतील राज्यातला असेल. पण शोध घेतला असता हा तरुण साधू विदर्भातील अकोल्याचा असल्याचं सिद्ध झालं. या तरुण साधूचं नाव आहे कालीचरण महाराज. मात्र, नंतर हेच महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. पण निमित्त एखाद्या स्तोत्राचं नाही तर शिवीगाळ केल्यामुळं. बरं ही शिवीगाळ त्यांनी एखाद्या भक्ताला किंवा सहकाऱ्याला केलेली नाही तर ती केलीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना. तेही तीही धर्मसंसदेत. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं होतं. त्यांचा हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. महात्मा गांधीं विषयी केलेल्या वक्तव्या प्रकरणी कालीचरण महाराजांना अटकही झाली होती.

 

‘राष्ट्ररक्षणासाठी हिंसा हा छत्रपतींचा आदर्श

राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिल्याचं बेताल वक्तव्य कालीचरण महाराज एका कार्यक्रमात केलं होतं. यावेळी बोलतांना ते म्हणाले होते की, “राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करणे हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श घालून दिला. आपण राष्ट्ररक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र उचललं पाहिजे. राष्ट्ररक्षणसााठी आपण हिंसक बनायला हवं. याशिवाय उपाय नाही”, असं विधान कालीचरण महाराजांनी केलं होतं.

‘धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही’

आपले सर्व देवी देवता हिंसक आहे. म्हणून धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? नाही ना… म्हणून, धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी काल अमरावती इथं बोलतांना केलं.

‘हिंदू महिलांना बुरख्यात राहावं लागेल’

अमरावती येथील याच कार्यक्रमात बोलतांना त्यांनी असचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘६० टक्के हिंदू महिला मतदान करत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला मुस्लिम व्हाव लागले. आपलं राहणीमान आणि मुस्लिमांचं राहणीमान यामध्ये खूप अंतर आहे. आपल्या देशात १४० कोटी जनता आहे, त्यात ९४ कोटी हिंदू तर ४६ कोटी मुस्लिम समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा वर्षांमध्ये त्यांचा पंतप्रधान होईल, आणि सर्व हिंदू महिलांना बुरख्यात राहावं लागेल’ असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं.

‘इस्लाम हा धर्मच नाही..’

कालीचरण महाराज १५ मे २०२२ रोजी नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी नाशिक येथील ग्रामदैवत असलेल्या भद्रकाली देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी इस्लाम धर्माविषयी बोलताना ते म्हणाले कि, ‘इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे’, हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे १०० टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

‘डुकराच्या दाताचे पाणी मुलीला प्यायला द्या’

लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतरणाविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी १४ डिसेंबर रोजी अहमदनगरमध्ये हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व कालीचरण महाराज यांनी केलं होतं. यावेळी सभेत कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “देशात रोज ४० हजार लव्ह जिहादची प्रकरणे होतात. यासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या… मग बघा डोकं ठिकाणावर येईल. सर्व भूत, प्रेम, तंत्र मंत्र बाहेर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!