Just another WordPress site

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शीझान विरूध्द कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल, काय आहे कलम ३०६?

अभिनेत्री तुनिषा शर्मानं वसईत एका मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणी तुनिशाच्या आईने पोलिसांकडं केलेल्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शीझान मोहम्मद खान याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाच्या ज्या कलमाखाली दाखल करतात ते कलम ३०६ नेमकं काय आहे? जर आरोप सिद्ध झाला तर शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.

कलम ३०६ नेमकं काय आहे?

भारतीय दंड विधानाच्या प्रकरण १६ मध्ये मानवास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात कलम ३०५ आणि ३०६ चा समावेश आहे. हे दोन्ही कलम आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात आहे. तसेच या प्रकरणात शिक्षेचेही तरतूदही करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यास किंवा आत्महत्येसाठी त्याच्यावर दबाव आणल्यास, अशा व्यक्तीवर या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

कमल ३०५ आणि ३०६ नेमका काय फरक आहे?

भारतीय दंड विधानातील कलम ३०५ आणि ३०६ हे दोन्ही कलम आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात आहेत. मात्र, या दोन्ही कमलांमध्ये फरक आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती जर १८ वर्षांखाली असेल किंवा नशेत असेल किंवा मानसिक रोगी असेल, अशा व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरोधात भांदविच्या कमल ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. या अंतर्गत दाखल झालेला गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा असतो. तर १८ वर्षावरील सज्ञान व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. कलम ३०६ अंतर्गत दाखल झालेला गुन्हाही दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा असतो.

शिक्षेची तरतूद काय?

भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास अशा व्यक्तीला मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास किंवा आर्थिक दंड अशा स्वरुपाची शिक्षा होऊ शकते. तर कमल ३०६ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला, तर अशा व्यक्तीला दहावर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही अशा स्वरुपाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!