Just another WordPress site

बाबुर्डी बेंद येथे सीएसआरडी कॉलेज व चाईल्ड लाईन यांच्या सयुंक्त विद्यामानाने समता सप्ताह साजरा

अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद या गावामध्ये सीएसआरडी (CSRD college) महाविद्यालयाच्या समाजकार्य प्रशिक्षणार्थी यांनी क्षेत्रकार्य पार पाडत असताना, समता सप्हात साजरा केला. सीएसआरडी कॉलेज आणि चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यामानाने ‘बालकांचे शोषण : आव्हाने आणि उपाय’ या कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी चाईल्ड लाईन समन्वयक महेश सूर्यवंशी (Mahesh Suryavanshi) यांनी विद्यार्थींनीनी सुरक्षीततचे धडे दिले.  सुशिक्षीत व असुरक्षित स्पर्श कसे ओळखावे व आपल्याला कोणी वाईट उद्देशाने स्पर्श करत असेल तर आपण आपला त्यापासून कसा बचाव केला पाहिजे व चाईल्ड लाईनला कशा प्रकारे मदत मागितली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गावाचे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रध्दा ढवळे यांनी केले.

यावेळी बोलतांना सुर्यवंशी यांनी चाईल्ड लाईन अंतर्गत  दिल्या जाणाऱ्या सुविधा, चाईल्ड लाईन कशाप्रकारे काम करते त्या बाबत जनजागृती करून गावातील मुलांना आणि नारिकांना  या बाबत माहिती दिली. यावेळी मंजुषा गावडे, राहुल कांबळे, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शुभांगी लोटके, इतर कर्मचारी आदींसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य या उपक्रमांतर्गत बालगुन्हेगारी, बालकाचे शोषणा, महिला अत्याचार,  स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह याबाबत जनजागृती केली. समाजामध्ये मुलींविषयी काही चुकीच्या समजूती पसरल्या असल्याने काही पालक मुलीची गर्भातच हत्या करतात किंवा जन्मानंतर तिला फेकून दिले जाते. आजपर्यंत अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्याने दिवसेंदिवस बालिकांची संख्या कमी होत चालली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात लग्नासाठी वधू मिळणे कठिण होईल. मुलाच्या तुलनेत मुली कोणत्याही बाबतीत कमी नाही, असे विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे मार्गदर्शन केले.

या सप्ताहामध्ये निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले  होते. या सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सीएसआरडी कॉलेजचे संचालक डॉ.सुरेश पठारे तसेच क्षेत्रकार्य पर्यवेक्षक नजीम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजकार्य प्रशिक्षणार्थी सोनाली गवारी, प्रणय राऊत, शशिकांत सूर्यवंशी आणि श्रध्दा ढवळे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुर्डी बेंद गावाचे सरपंच व इतर गावकरी  यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन शशिकांत सुर्यवंशी, श्रद्धा ढवळे  यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!