Just another WordPress site

Independance Day 2022 : फक्त भारतच नाही तर जगातील ‘हे’ पाच देशही १५ ऑगस्टलाच साजरा करतात स्वातंत्र्य दिन

१५ ऑगस्ट १९४७ ला भारतातील लोकांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. अनेक वर्षे गुलामगिरीच्या साखळदंडात अडकून राहिलेल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळवण्यासाठी अनेक शूरवीरांनी मोठं योगदान दिलंय. त्यांच्या योगदामुळेच गुलामगिरीतीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळं दरवर्षी आपण  १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करतो. मात्र, फक्त भारतच नाही तर इतर पाच देशही १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाले. हे देश कोणते आहेत? याच विषयी जाणून घेऊ.महत्वाच्या बाबी 

१. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले

२. १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात

३. १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगोला देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले

४. लिकटेंस्टाईन देशाला १५ ऑगस्ट १८६६ रोजी स्वातंत्र्य मिळाले


इंग्रजांनी भारताला स्वातंत्र बहाल करताना देशाची फाळणीही केली. त्यामुळे पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. पाकिस्तानला १४ ऑगस्ट तर भारताला १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. भारतात स्वातंत्र्यदिन साजरा करताना सर्व सरकारी आणि खासगी संस्था, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावला जातो. सगळीकडे मिठाईचं वाटप केलं जातं. देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन ध्वजवंदन करुन देशाला संबोधित करतात.अशा प्रकारे भारतात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.


बहरीन

बहरीन या देशाला १५ ऑगस्ट १९७१ मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र मिळालं. हा पहिला अरब देश होता जिथे तेलाचे साठे सापडले त्यानंतर सन १९३१ मध्ये तिथं तेल शुद्धिकरणाचा कारखाना उभारला गेला. ब्रिटन आणि ऑटोमन सरकारने १९१३ मध्ये बहारिनच्या स्वातंत्र्य करारावर स्वाक्षरी केली असली तरी तो १९७१ पर्यंत ब्रिटिश अंमलाखाली राहिला. त्यानंतर सन १९७१ रोजी बहारिन देश स्वतंत्र झाला. वास्तविक बहारिन १४ ऑगस्ट रोजी मुक्त झाला. मात्र, या  देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस ओळखला जाऊ लागला.

रिपब्लिक ऑफ काँगो

रिपब्लिक ऑफ काँगो हा एक मध्य अफ्रिकन देश आहे. सन १९६० मध्ये फ्रान्सपासून हा देश स्वतंत्र झाला. तत्पूर्वी फ्रेन्च राज्यकर्त्यांनी या देशावर ८० वर्षे राज्य केलं.त्यानंतर १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगोला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि तो रिपब्लिक झाला. 


लिकटेंस्टाईन

लिकटेंस्टाईन देशाला १५ ऑगस्ट १८६६ रोजी स्वातंत्र्य मिळाले. लिकटेंस्टाईन जर्मनीपासून स्वतंत्र झाला. १९४० पासून, हा देश १५ ऑगस्ट रोजी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. हा स्वातंत्रदिन साजरा करत असताना या देशात रात्री १० वाजण्याच्या सुमारास पारंपारिक पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी केली जाते. लिकटेंस्टाईन देशाची राजधानी असलेल्या वडूझ येथील किल्ल्यासमोरील लॉनमध्ये हजारो नागरिक एकत्र जमतात. यावेळी इथला प्रिन्स आणि पार्लमेंटचे अध्यक्ष देशातील जनतेला संबोधित करतात. 

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया देश १५ऑगस्ट १९४५ रोजी स्वतंत्र झाला. दक्षिण कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने दक्षिण कोरियाला जपानी ताब्यातून बाहेर काढले. कोरियाचे लोक हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करतात.


उत्तर कोरिया

उत्तर कोरिया हा देश १५ ऑगस्ट १९४५ रोजी स्वतंत्र झाला आणि दक्षिण कोरियाप्रमाणे उत्तर कोरियालाही जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. हा देश हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून देखील साजरा करतो. विशेष म्हणजे सुट्टी असल्यामुळे तेथील लोक या दिवशी लग्न करतात, जी आता एक परंपरा बनली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!