Just another WordPress site

Dog Suicide Bridge: माणसंच नाही, कुत्रे देखील ‘या’ रहस्यमयी पुलावरून उडी मारून आत्महत्या करतात, अजूनही गुढ कायम

जगात अशी अनेक ठिकाणं आणि गोष्टी आहेत, ज्या खूप रहस्यमयी आहेत. या जागांचं गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेलं नाही. अनेक ठिकाणी लोक आत्महत्या करतात. मानसिक तणाव आणि इतर अनेक कौटुंबिक कारणांमुळे माणसं आत्महत्या करतात, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याने आत्महत्या केल्याचं ऐकलंय का?  नाही ना, तुम्हाला हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल, की प्राणीही आत्महत्या करतात. जगात अशी एक रहस्यमय जागा आहे, जिथे कुत्रे येऊन आत्महत्या करतात. स्कॉटलंडमध्ये ही जागा आहे.

आपल्या देशात श्वानप्रेमींची संख्या काही कमी नाही, कुत्रे मांजरी ससे पाळणे हे काय नवीन नाही, शिवाय आपण तर त्या प्राण्यांना खूप जीव लावतो! शिवाय या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी किंवा संवर्धनासाठी कित्येक संस्था तसेच एनजीओ कार्यरत असतात. मात्र,  स्कॉटलंडमध्ये एक असा पूल आहे जिथे कुत्र्यांना नेण्यास सक्त मनाई आहे. कारण त्या पुलावरून कुत्रे आत्महत्या करतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. स्कॉटलंडच्या डांबार्टन जवळ एक गाव आहे मिल्टन. इथला एक पूल आहे, जो कुत्र्यांना आत्महत्या करण्यासाठी आपल्याकडे आकर्षित करतो. ६० च्या दशकापासून आतापर्यंत या पुलावरून उडी मारून जवळपास ६०० कुत्र्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळं स्कॉटलंडमधला हा पूल सुसाइड ब्रिज  म्हणूनच ओळखला जातो. दगडी मजबूत बांधकामाचा हा पुरातन शैलीतला पूल आजही त्याच्या मजबुतीची साक्ष देत उभा आहे. १८५९ मध्ये बनवल्या गेलेल्या या पुलाचे नाव ओवरटॉन पुल आहे. १९५० ते १९६० च्या दशकामध्ये याला पहिल्यांदा कुत्र्यांच्या आत्महत्या होतात हे लक्षात आले. आत्महत्या म्हटलं जाण्याचं कारण असं की पुलावरून कुत्रे कोणत्याही कारणाशिवाय अचानक उडी मारतात आणि ५० फूट उंचावरून पडून त्यांचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये जर उडी मारून जर एखादा कुत्रा जिवंत राहिलाच तरी तो पुन्हा पुलावरून उडी मारून आत्महत्या करत असे. सारख्या होणाऱ्या आत्महत्या बघून ह्या पुलावर चेतावनी देणारा बोर्ड लावण्यात आला. विचित्र गोष्ट तर ही आहे की, जेवढया पण कुत्र्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या सगळ्या रहस्यमयी होत्या. या सर्व आत्महत्या ओवरटॉन पुलाच्या एकाच बाजूने केल्या गेल्या होत्या, आणि खास  करून एकाच जागेवरून केल्या गेल्या. आतापर्यंत शेकडो कुत्र्यांनी या पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पुलावर आल्यावरच कुत्र्यांना इथून खाली उडी मारण्याची इच्छा का होते, या रहस्यामागचं कारण अद्यापही उलगडलेलं नाही. आजही हा पूल एक कोडं बनून लोकांसमोर उभा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!