Just another WordPress site

कमाईच्या बाबतीत रितेश ‘वेड’ने मोडला नागराजच्या सैराटचा रेकॉर्ड, आतापर्यंत ‘इतकी’ कमाई

मुंबई: रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ सिनेमा दिवसेंदिवस नवे रेकॉर्ड करत आहे. आता ‘वेड’ने प्रदर्शनानंतर तगडी कमाई करत नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’लाही मागे टाकले. दुसऱ्या रविवारी ‘वेड’ने ५.७० कोटींची कमाई केली. व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरलेला सैराटने सिनेमागृहात चालत असताना कोणत्याही दिवशी एवढी कमाई केली नव्हती. सैराटला मागे टाकत दुसऱ्या रविवारी सर्वाधिक ५.७० कोटींची कमाई ‘वेड’ने केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सैराटची सर्वाधिक कमाई ४.६१ कोटींची होती. मंजुळेंच्या सैराटने सिनेमानेही दुसऱ्या रविवारीच ही सर्वात जास्त कमाई केली होती. सैराटचा हा रेकॉर्ड आता ‘वेड’ने मोडला.

‘वेड’ने केवळ सैराटचा रेकॉर्ड मोडलेला नाही, तर पहिल्या आठवड्यातील स्वत:चाच रेकॉर्डही या सिनेमाने मोडला. पहिल्या आठवड्याच्या वीकेंडला ‘वेड’ने १० कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंडला सिनेमाने १२.७५ कोटींची कमाई केली.
दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी सिनेमाने २.५२ कोटी तर शनिवारी ४.५३ कोटी कमावले. शनिवारची ही कमाई सिनेमाची आतापर्यंची सर्वाधिक कमाई होती. सिनेमाने स्वत:चाच हाही रेकॉर्ड मोडत रविवारी ५.७० कोटींची कमाई केली. प्रदर्शित झाल्यापासून ‘वेड’ने एकूण ३३.४२ कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि बिझनेस अनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर याविषयी माहिती दिली आहे.

केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर सिनेविश्वातील कलाकारांकडून प्रशंसा मिळवण्यातही वेडला यश आले आहे. रितेशच्या सिनेमाचे बॉलिवूडमधील दिग्गजांनी कौतुक केले आहे. अभिषेक बच्चन, जॉनी लिव्हर या कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करत रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ची प्रशंसा केली. प्रेक्षकांनीही हा सिनेमा डोक्यावर उचलून धरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!