Just another WordPress site

Illustration of herbicides not affecting weeds : तणनाशकांच्या दरात दुपटीने वाढ होऊन सुध्दा गवत मरत नाही; शेतकरी त्रस्त

यंदा अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात मशागत करण्यास वेळ मिळाला नाही. यामुळे शेतात गवत, तणांची चांगलीच वाढ झाली.  त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी महागड्या तणनाशकांचा वापर करत आहेत. मात्र, तणनाशकांचा तणांवर काही परिणाम होत नसल्याचं चित्र आहे.महत्वाच्या बाबी 

१. सततच्या पावसामुळे शेतात गवत, तणांची वाढ  

२. शेतात तणनाशक फवारल्याने पिकेच करपली

३. ‘बोगस तणनाशकांची शासनाचे पाहणी करावी’ 

४. तणनाशकांचा तणांवर परिणाम होत नसल्याचं चित्र  


गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तणनाशकाचे भाव दुप्पट झाल्याने शेतकरी त्रस्त झाले.  तणनाशकांच्या आणि खतांच्या दरात झालेल्या वाढ झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला.   शेतातील तण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. परिसरातील सर्वच पिके एकाच वेळी खुरपणीस येत असतात. अशा वेळी वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे तणांमुळे पिकांचे नुकसान होते. मजुरीवर जास्त खर्च होतो आणि पीक तोट्यात जाते. याला पर्याय म्हणूनच शेतकरी तणनाशकांचा वापर करतात. मात्र, शेतात वाढलेलं तण  पिकातून काढण्यासाठी शेतकरी महागड्या तणनाशकांची फवारणी करत असले तरी त्याचा पिकांवर काही परिणात होत नसल्याचं चित्र आहे.  त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला.  वर्धा जिल्हातील परीसरात शेतकरी बांधव शेतात गतत वाढल्यामूळे तणनाशकची फवारणी करताहेत. मात्र शेतातील गवत मरतच नसून त्याउलट पराटीचे झाड फवारनी केल्याने कोमूजन जात आहे. तणनाशक औषधांमुळे शेतातील पिके कोमजून जात असल्यानं शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले.  पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी तणनाशक औषधांची फवारणी करत आहेत. तर पिकांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी टॉनिक आणि  किटकांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीड नाशकांचा फवारा सध्या पिकांवर मारल्या जात आहे. मात्र, या औषधांच्या फवारणीचा विपरीत परिणाम झाल्याचा प्रकार प्रकार वर्धा जिल्ह्यात समोर आला.प्रामुख्याने पराटी आणि सोयाबीन  पिकाला तणनाशकाचा फटका बसला असून, कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करण्यासह संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. यंदा तणनाशकांचे दर प्रति लीटर ६२० रूपये  आहेत.  मागील वर्षी पेक्षा या वर्षी दुप्पट कीमत वाढल्यामूळे शेतकऱ्यांना खरेदी करने खुप अवघड झालं. शेतकऱ्यारी निंदणाचा खर्च टाळून तणनाशकची फवारनी करतो. मात्र, तणनाशकांचा तणांवर कोणताही परिणाम न होता, पिंकावर परिणात होत असल्यानं बाजारपेठेत बोगस तणनाशक आल्याचा आरोप शेतकरी बांधव करीत आहेत. दरम्यान,  सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आधिच त्रस्त आहे. त्यात फवारणीचे औषध फवारल्यामुळे मोठे नुकसान होत असल्यानं  बोगस तणनाशकांची  शासनाने  आणि कृषी विभागाने पाहणी करावी, अशी मागणी  शेतकरी करताहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!