Just another WordPress site

एक व्यक्ती किती सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो? आरबीआयचा नियम काय सांगतो?

मुंबई : तुमची बचत खातीकिती आहेत, एक, दोन की त्यापेक्षा जास्त? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे तुम्ही कधी विचार केलाय का की भारतात एक व्यक्ती किती बचत खाती उघडू शकतो. याबाबत आरबीआयचा नियम काय आहे. तुमचीही जर बँकेतमल्टीपल खाती असतील तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

एक व्यक्ती भारतात कितीही सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो. त्यासाठी आरबीआयकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाहीत. देशात अशी कोणतीही मर्यादा नाही की ग्राहकांची अमूक एक खाती असावीत किंवा या मर्यादेपेक्षा जास्त खाती उघडता येणार नाहीत असा कोणताही नियम नाही. आरबीआयने बँक ग्राहकांवर अशी कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही.

तुम्ही सेव्हिंग अकाउंट नीट ठेवलं तर तुम्हाला त्याचे फायदेही घेता येतात. मात्र जर ते मेंटेन करता आलं नाही तर मोठा फाइन भरावा लागतो. त्यामध्ये नियमानुसार मिनिमम रक्कम ठेवणं बंधनकारक आहे. नुसतं खातं उघडलं म्हणजे झालं नाही तर त्याचं मॅनेजमेंटही करता येणं महत्त्वाचं आहे. नाहीतर पैसे अडकतात किंवा फाइन स्वरुपात आपल्याकडूनच बँक वसूल करते.

जर तुमच्याकडे एक किंवा दोन खाती असतील तर तुम्ही दोन्ही अगदी सहजपणे मॅनेज करू शकता, पण बॅलन्स जास्त असेल तर हे काम तुमच्यासाठी थोडं अडचणीचं ठरू शकतं. याशिवाय आर्थिक ओढाताणही होऊ शकते. त्यामुळे शक्यतो दोन किंवा तीनपेक्षा जास्त खाती ठेवू नयेत असं काही आर्थिक सल्लागार सांगतात.

एकापेक्षा जास्त बचत खातं उघडण्यामागे कारण काय हे तुमच्या डोक्यात पक्क असायला हवं. शक्यतो सॅलरी आणि सेव्हिंग दोन वेगवेगळी ठेवावीत. बँक खाते सांभाळणंही महत्त्वाचे आहे.

त्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील, त्या तुलनेत किती फायदा आणि रिटर्न्स मिळेल याची यादी तयार करा, सगळ्या नफा आणि तोट्याचा विचार केल्यानंतरच खातं उघडा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!