Just another WordPress site

पोटच्या लेकीवरवच जन्मदात्या बापासह आजोबा अन् चुलत्याकडून लैंगिक अत्याचार, थरकाप उडवणारी घटना

पुणे : देशाला हादरवून सोडणारी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्यात मुलगी, नात आणि पुतणी या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. पुण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सख्ख्या वडिलांकडून, आजोबांकडून आणि चुलत्याकडून ६ वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना उघडकीस आली.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातून शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या मुलीने कॉलेजमध्ये समुपदेशन सुरू असताना ही सर्व आपबिती सांगितली आहे. दरम्यान याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीचे आई-वडिल शहरात मोलमजुरी करुन घर चालवतात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२-१३ वर्षाची असताना मुळगावी तिच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन एक वर्षभर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याचवेळी तिच्या ७० वर्षांच्या आजोबांनी देखील तिच्याशी शरारिक सबंध ठेवले. एप्रिल २०१८ मध्ये ती पुण्यात परतल्यानंतर तिने या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली. मात्र वडिलांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत असलेल्या या मुलीने तिच्या कॉलेजमधील एका कार्यक्रमात समुपदेशकापुढे ही सर्व घटना सांगितली. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!