Just another WordPress site

कांदा घेऊन जात असलेल्या पिकअपचा टायर फुटल्यानं मोठा अपघात, तिघांचा मृत्यू

सोलापूर : मोहोळजवळील कोळेगाव हद्दीतून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेल्या पिकअपचा टायर फुटला. यामुळे पिकअप पलटी झाल्याने दोन शेतकऱ्यांसह एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत घडली.

अपघातात दत्तात्रय भानुदास शेळके, श्रीमंतसिंग धोडिंराम परदेशी, नितीन बजगे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे शेतकरी रात्री शेतातून कांदा घेऊन सोलापूर येथील बाजार समितीत लिलाव करण्यासाठी आणत होते. पहाटे दीड वाजताच्या सुमारास वेगात असलेल्या पिकअपचे टायर अचानक फुटले.

टायर फुटल्याने पिकअप पलटी झाला. पलटी झाल्यानंतर गाडीत बसलेले शेतकरी दूर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक नितीन बजगे गंभीर जखमी झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रूग्णालय त्यांचाही मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसांत झाली असून पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!