Just another WordPress site

गुड न्यूज, आता व्हॉट्सअपवरही करता येणार Ola आणि Flight Booking; जाणून घ्या, नेमकी प्रक्रिया काय?

WhatsApp हे सतत आपल्या वापरकर्त्यांसाठी त्याच्या अॅप्समध्ये नवनवीन फीचर्स जोडत असते. जगभरातील अनेक युजर्स याचा वापर करतात. नुकतेच, व्हाट्सअपने AI-चालित चॅटबॉट हे नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. त्याच्या मदतीने कॅब बुकिंगपासून ते फ्लाइट स्टेटस आणि इतर सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो.

मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून तुम्ही या सुविधांचा लाभ व्हाट्सअपवर घेऊ शकता. या फीचर अंतर्गत लोकांना मासिक रेशन, फूड ऑर्डर, कॅब बुकिंग, फ्लाइट बुकिंग तसेच इतर सुविधा दिल्या जातील. यासाठी तुम्हालाही कोणतेही अॅप डाउनलोड न करता या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या सुविधांचा लाभ कसा घेऊ शकता याची हे जाणून घेऊया.

याचा वापर कसा कराल ?

१. तुम्हाला  व्हाट्सअपवर (WhatsApp) या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ७९७७०७९७७० हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.
२. यानंतर तुम्हाला हाय मेसेज लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला या सर्व सुविधांचा कॅटलॉग दिसेल.
३. यानंतर तुम्हाला ज्या काही सुविधा वापरायच्या आहेत किंवा वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्या तुम्हाला निवडाव्या लागतील.
४. तुमचे नाव, पत्ता इत्यादी माहिती द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. तुम्ही ऑनलाइन किंवा खरेदीनंतर पैसे देऊ शकता.

Whatsapp वर फ्लाइट स्टेटस कसे तपासाल ?

इंडिगो आणि एअर इंडियाचे स्टेटस तुम्ही व्हाट्सअपद्वारेही तपासू शकता. तुमच्या फोनमध्ये ९१५४१९५५०५ हा नंबर सेव्ह करून तुम्ही या दोन एअरलाइन्सच्या विमानांची स्थिती जाणून घेऊ शकता.

उबर कॅब बुक कशी कराल ?

व्हाट्सअपद्वारे कॅब बुकिंगसाठी कोणालाही ७२९२०००००२ हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. यानंतर, तुम्हाला हाय मेसेज पाठवावा लागेल. कंपनीकडून एक लिंक पाठवली जाईल, ज्यावर तुम्ही लॉगिन करून कॅब बुक करू शकता. यावर पिकअप आणि लोकेशनची माहिती द्यावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!