Just another WordPress site

एकदम भारी! प्रति महिना फक्त २०० रुपये गुंतवा, अन् वर्षाला मिळाला ७२,००० हजार रुपयांचा परतावा, जाणून घ्या नेमकी काय आहे योजना?

तुमचं लग्न झालंय का? तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करत आहात का? तुमचं उत्तर जर होय असं असेल, तर मोदी सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही एक अशी योजना आहे, जी गुंतवणुकीवर चांगला परतावा देते. जर तुमचं मासिक उत्पन्न १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ही योजना तुमच्या फायद्याची ठरु शकते. या योजनेअंतर्गत, विवाहित जोडप्याला दरमहा २०० रुपये गुंतवावे लागतात, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर वर्षाला ७२,००० रुपये पेन्शन मिळते. दरम्यान, या योजनेला लाभ कोण घेऊ शकतं? नेमक्या अटी काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना?

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ही सरकारी योजना असून ही योजना श्रम आणि रोजगार मंत्रालयानं २०१९ मध्ये श्रम सुरू केली. ही योजना वृद्धापकाळात असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्याचं काम करते. ही योजना केवळ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. विशेषत: या योजनेत मजूर, पथारीवाले आणि कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कष्टकरी जनेतला पेन्शनची सुविधा देण्याचा प्रयत्न या योजनेंच्या माध्यमातून करण्यात येतो.

 

कोण घेऊ शकतं श्रम योगी मानधन योजनेचा लाभ?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने काही पात्रता निश्चित केली. केवळ तेच लोक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच जे असंघटित क्षेत्रात काम करतात. असंघटित म्हणजे – ज्यांना जगण्यासाठी रोज काबाडकष्ट करावे लागतात आणि ज्यांना निश्चित पगार, निश्चित रजा किंवा पेन्शन नाही. त्यात दैनंदिन सफाई कामगार, गवंडी, रिक्षाचालक, भाजी विक्रेते, वीटभट्टी कामगार, घरकामगार, धोबी, भूमिहीन मजूर, शेतमजूर, विडी उत्पादक यांचा समावेश होतो. या व्यवसायांत गुंतलेले कामगार आणि ज्यांचं मासिक उत्पन्न १५,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, तसेच ज्यांचं वय १८-४० वर्षे आहे, असे लोक योजनेसाठी पात्र आहेत.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची तिसरी महत्त्वाची अट म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केले पाहिजे. ज्या लोकांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले जाणार नाही, त्यांना प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

कोणाला मिळणार नाही लाभ?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत, जे लोक केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मंत्रालयात किंवा विभागात कायम, तात्पुरते किंवा कंत्राटी तत्त्वावर काम करतात त्यांना लाभ मिळणार नाही. तसंच ज्या लोकांनी आयकर भरला आहे किंवा त्यांच्या उत्पन्नावर कधीही कर भरला आहे त्यांना प्रधानमंत्री श्रम योगी योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. थोडक्यात काय तर अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमाई करपात्र नसावी.

 

PM-SYM योजनेतअशा प्रकारे पेन्शन घेता येते?

विवाहित जोडपे ७२,००० रुपये वार्षिक पेन्शन कसे मिळवू शकतात हे समजून घेण्यासाठी येथे एक सोपी गणना आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती ३० वर्षांची असल्यास, योजनेसाठी मासिक योगदान सुमारे १०० रुपये प्रति महिना असेल – अशा प्रकारे एका जोडप्याचे प्रति महिना योगदान २०० रुपये असेल. अशा प्रकारे, त्या जोडप्याचे वार्षिक योगदान २,४०० रुपये असेल. वयाच्या ६० वर्षांनंतर, जोडप्याला वार्षिक ७२,००० रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

 

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय?

प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन अंतर्गत, प्रत्येक ग्राहकाला ६० वर्षे वय झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपयांची किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल. शिवाय, निवृत्तीवेतन प्राप्त करताना सदस्याचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या जोडीदारास लाभार्थ्याला मिळालेल्या पेन्शनपैकी ५० टक्के कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याचा हक्क असेल. कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारासाठी लागू आहे.

 

कशी करणार नोंदणी?

या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ग्राहकाकडे मोबाईल फोन, बचत बँक खाते आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. पात्र सदस्य प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजनेसाठी जवळच्या CSC म्हणजे, सामान्य सेवा केंद्रावर जावं लागेल. तिथं आधारकार्ड आणि सेव्हिंग्स खाते किंवा जनधन खात्याशी संबंधित माहिती आयएफएससी कोडसहीत द्यावी लागेल. पुरावा म्हणून पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट सादर करता येईल. खातं सुरु करताना वारसदारही निवडता येईल.
ही सर्व माहिती दिल्यानंतर महिन्याला किती पैसे भरावे लागतील याची सर्व माहिती अर्जदाराला दिली जाईल. सुरुवातीला या योजनेअंतर्गत अर्जदाराला रोख स्वरुपात पैसे जमा करावे लागतील. खातं पूर्णपणे सुरु झाल्यानंतर श्रम योगी कार्ड अर्जदाराला दिलं जाईल. तुम्हाला या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८०० २६७ ६८८८ टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करता येईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!