Just another WordPress site

“आफताबला फाशीची शिक्षा द्या”; श्रद्धा वालकर प्रकरणावर अभिनेत्रीची कविता कौशकीची संतप्त प्रतिक्रिया

वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा दिल्ली येथे करण्यात आलेला खून सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतोय. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मात्र या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. यानंतर या घटनेप्रकरणी अनेक कलाकार संताप व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कविता कौशिक देखील संतप्त प्रतिक्रिया दिली.

राजधानी दिल्लीपासून मुंबईपर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे गूढ उलगडत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दिल्लीतील भीषण हत्याकांडात ज्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत, त्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. या घटनेविरोधात जगभरात संताप व्यक्त केला जातोय. अभिनेत्री कविता कौशिक देखील यावर भाष्य केलं. कविता कौशिक ही तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. समाजातील तिला न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ती नेहमी भाष्य करत असते. आता तिने ट्वीट करत आफताब अमीन पूनावालाबद्दल राग व्यक्त केला आहे. तसंच त्याला मोठ्यातली मोठी म्हणजे फाशीची शिक्षा मिळायला हवी असं ती म्हणाली. कविताने एक ट्वीट करत लिहिलं की, “आफताबला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी दुसरी कोणतीही शिक्षा योग्य असू शकत नाही.”

कविता कौशिकच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे आफताबने श्रद्धाचा जितक्या निर्घृणपणे खून केला, तितकीच क्रूर शिक्षा त्यालाही देण्यात यावी, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी कविताच्या ट्वीटवर दिली.

राजधानी दिल्लीपासून मुंबईपर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेविरोधात जगभरात संताप व्यक्त केला जातोय. अभिनेत्री स्वरा भास्करने देखील यावर भाष्य केलं. स्वराही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने श्रद्धा प्रकरणावर प्रतिक्रिया देत एक ट्वीट केले आहे. “हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे. याविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यानेच आपल्यासोबत असे वागणे अतिशय वाईट आहे. या घटनेविषयी ऐकून मला प्रचंड त्रास झाला. आशा आहे की पोलीस त्यांचा तपास त्वरीत पूर्ण करतील आणि या राक्षसाला योग्य ती कठोर शिक्षा देतील” या आशयाचे ट्वीट करत स्वराने संताप व्यक्त केल.

दरम्यान श्रद्धाचे २०१९ पासून आफताबशी प्रेमसंबंध होते. तेव्हा ते दोघेही वसईला वास्तव्याला होते. एका डेटिंग अ‍ॅपवर त्यांची ओळख झाली होती. ते दोघे एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते. काही महिन्यांनंतर श्रद्धाने तिच्या कुटुंबियांना आफताब आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले. आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. कुटुंबियांचा विरोध पत्करत ती आफताबसह नायगावला राहायला गेली. नंतर मार्च २०२२ मध्ये ते दिल्लीला राहायला गेले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आफताबला अटक केली असून न्यायालयाने त्यााला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!