Just another WordPress site

कर्मचाऱ्यांना भलंमोठ्ठ सुट्यांचं गिफ्ट, राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना यंदा ‘इतक्या’ सुट्या; पाहा सुट्ट्यांचे कॅलेंडर

मुंबईः राज्य सरकारने २०२३ या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना वर्षभरात २४ सुट्ट्या मिळणार आहेत. तसेच चार सुट्ट्या शनिवार, रविवारी आल्या आहेत.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १८ फेब्रुवारी महाशिवरात्री, १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, ६ मार्च होळी, ७ मार्च धूलिवंदन, २२ मार्च गुढीपाडवा, ३० मार्च राम नवमी, ४ एप्रिल महावीर जयंती, ७ एप्रिल गुड फ्रायडे, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, ५ मे बुद्धपौर्णिमा, २९ जून बकरी ईद, २९ जुलै मोहरम, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट पारसी नववर्ष दिन, १९ सप्टेंबर गणेश चतुर्थी, २८ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, २४ ऑक्टोबर दसरा, १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, २७ नोव्हेंबर गुरुनानक जयंती, २५ डिसेंबर नाताळ अशा सार्वजनिक सुट्ट्या आहेत.

महाशिवरात्री, रमझान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी, तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि लक्ष्मीपूजन रविवारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!