Just another WordPress site

गौतमी पाटील अख्खं मार्केट खाणार! गौतमी झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात; थायलंडमध्ये झालंय शूटिंग

गौतमी पाटील हे नाव ठाऊक नाही, असा तरुण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. तुम्ही तिला फॉलो करा किंवा करू नका, गुगलवर तिचं नाव सर्च करा किंवा करु नका. तिच्या नावाच्या चर्चाच इतक्या आहेत की नकळतच तिचा फोटो सोशल मीडियावर तुमच्या समोर येत असेल. लावणी डान्सर अशी ओळख असलेली गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लील नृत्यामुळे चर्चेत असलेली गौतमी आता चित्रपटात झळकणार आहे.

काल परवापर्यंत कोण कुठली गौतमी हे अनेकांना ठाऊकही नव्हतं. पण, एका व्हायरल व्हिडीओनं तिला द्यायची ती प्रसिद्धी दिलीच. काही महिन्यांपूर्वी एका मराठी गाण्यावर गौतमी अतिशय अश्लिल हावभाव करताना दिसली. एका जाहीर कार्यक्रमात तिनं शेकडोंच्या उपस्थित असा अश्लिल डान्स केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तसंच लावणी कलावंतांकडून तिच्यावर चांगलीच टीकाही झाली. त्या एका व्हिडिओमुळं ती प्रसिद्धीच्या झोतात आली. सध्या तिचे डान्स व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल होतात. सिनेसृष्टीतील एखाद्या कलाकाराची जितकी क्रेझ असते ना, तितकी गौतमीची क्रेझ असल्याचं दिसतं. इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं. गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम राज्यभर होतायत. तिचे म्यझिक अल्बमही लॉन्च झालेयत. तिच्या कार्यक्रमांना आजकाल तूफान गर्दी होते. अगदी स्टेजपासून ते लांबवर लोक उभे राहून तिचे कार्यक्रम बघतात. तिच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांना चाहत्यांना आवरही घालावा लागतो. थोडक्यात काय तर गौतमी ही सोशल मीडियावर आपल्या व्हीडिओमुळे चांगलीच धुमाकूळ घालतेय. आपल्या डान्स आणि एक्स्प्रेशन्सने तिनं तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. त्यामुळं २६ वर्षीय गौतमीला लावणी क्वीन म्हणून ओळखलं जातं.

आपल्या डान्समधील एक्स्प्रेशमुळं तिला सोशल मीडियावर आजही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. तरीही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तर म्हणे अनेक कार्यक्रमांत दिसणारी ही सुंदरा आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. गौतमीच्या आगामी चित्रपटाच नाव ‘घुंगरु’ असं आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिलीये. गौतमीच्या ‘घुंगरु’ या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपीसह परदेशातही झालंय. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केलीये. चित्रपटात अभिनेता कोण आहे? याबद्दल अद्यापही समजलं नसलं तरी बाबा गायकवाड यांच्यासोबत ती स्क्रिन शेअर करणार असल्याचं बोलल्या जातंय. या सिनेमात गौतमी पाटील नक्की कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या चित्रपटामधून ती नक्कीच धुमाकूळ घालणार.

गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्यासह ‘घुंगरु’ या सिनेमात सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील असणार आहेत. या सिनेमाचं कथानक कलावंत आणि लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणारं असल्याचं सांगण्यात येतंय. ‘घुंगरु’ या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा बाबा गायकवाड यांनी सांभाळलीये.

दरम्यान, गौतमीच्या डान्स कार्यक्रमांनी तुफान गर्दी होताना दिसतेय. प्रेक्षक कुणी झाडावर बसून तिचा डान्स बघतोय, तर कुणी गच्चीवर चढतोय. तिची ही क्रेझ पाहिल्यानंतर आता ती चित्रपटात काय जादू करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!