Just another WordPress site

पनवेलमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचा रेल्वेच्या खड्ड्यात मृत्यू, नातेवाईक संतप्त

पनवेल : पनवेल मधील पंचशील नगर येथील रेल्वेच्या नवीन रुळाचे काम चालू आहे. त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले असून पंचशील नगरमधील रहिवाशी असलेली माही सिद्धेश वाघमारे ह्या चार वर्षीय मुलीचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचशील नगरलगत रेल्वेच्या नवीन रुळांचे काम चालू असून त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आलेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेय. पंचशील नगरमध्ये राहणारी माही वाघमारे ही खेळता खेळता चुकून खड्डयातील पाण्यात पडली. काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेऊन माहीला खड्ड्याबाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. रेल्वेचे काम चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे केलेत. मात्र ह्या खड्ड्यांच्या बाजूला कुठेही कुंपण किंवा बोर्ड लावण्यात आलेला नाहीये. तसेच शेजारी लोकवस्ती असून येथे एकही सुरक्षारक्षक नेमलेला नसल्यामुळे अशा घटना अनेक वेळा घडल्यायेत. या आगोदर देखील पनवेल रेल्वेचे काम चालू असताना २०१९ मध्ये तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान, आताही रेल्वेने दिलेल्या ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा येथे नेमली नसल्यामुळे चार वर्षीय माहिचा नाहक जीव गेला. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांसह संपूर्ण परिसरातील रहिवाशी आक्रमक झाले असून या खड्ड्यांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!